आर्णी (प्रतिनिधी)
– प्रवाशांना केवळ सेवा नव्हे तर सौंदर्यदृष्टीने समाधान देण्याच्या दिशेने आर्णी बसस्थानक नवे पाऊल टाकत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ‘स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ या राज्यव्यापी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मंगळवार (ता.६ मे ) आर्णी येथे थेट प्रत्यक्ष पाहणी मोहीम पार पडली.
ही मोहीम म्हणजे केवळ औपचारिकता नव्हती, तर तिथल्या प्रत्येक कोपऱ्यातल्या स्वच्छतेचा सखोल आढावा घेण्यात आला. परिसरातील रंगरंगोटी, निसर्गपूरक सजावट, डिजिटल सुविधा, पाणी व स्वच्छतागृह व्यवस्थापन, तसेच वाहनतळावरची शिस्त याची कसून पाहणी झाली.
विशेष म्हणजे, यावेळी कुठेही ढिसाळपणा न दिसता कर्मचाऱ्यांनी टापटीप व्यवस्थेचं जपलेलं भान ठळकपणे जाणवत होतं. वाहनचालक, प्रवासी व अधिकारी यांचा यामध्ये समन्वय दिसून आला.
या पाहणी साठी
प्रदीप सालोडकर – विभागीय अधीक्षक नागपुर
शोलैश भारती – वि वर्ग अधीकारी नागपुर
उसवणे साहेव आगार वेवस्तपण दारव्हा
श्रीमती पवार मैडम वाहतुक निरीक्षक
दारव्हा
आर एल तालवटकर व्यवस्थापक प्रमुख आर्णी
सद्दाम शेख – पत्रकार आर्णी
अजीस शेख -परवाना धारक प्रवासी मीत्र व स्थानिक कर्मचारी उपस्थित होते.
.
स्वच्छ व सुंदर सर्वेक्षण पथकाला आर्णी बसस्थानकाच्या पिण्याचे पाणी उपलब्ध्व नसल्याचे व तसेच नवीन बांधकाम सुरू असल्याने बसेस जुन्या बस्स्यानकात. नलागत नसल्याने प्रवाश्याना भर उन्हात उगे राहावे लागते हे निर्देशनान आणून दिले – सद्दाम शेख नमो महाराष्ट्र तालुका प्रतिनिधी हे स्वस्छतादूत म्हणून आर्णी बसस्टँड येथे गेले असता सदर पथकाला निदर्शनात आणून दिलेले आहे