कश्मीर खोऱ्यात पर्यटनासाठी पहलगाम येथील निसर्ग सौन्दर्याचा आनंद लुटत असलेल्या निरपराध २६ पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या झाडून ठार करण्यात आले होते.या घटने मुळे देशभर व जगात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. भारत सरकारने देखील कुठल्याही स्थितीत या घटनेचे चोख उत्तर देण्याचे ठरविले तसा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृह मंत्री अमित शहा यांनीही दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याचा इशारा दिला होता.
अतिरेकी हाफिज सईज याचा गड मानला जाणाऱ्या मुदिरके येथे ७ मे रोजी झालेल्या भारताने केलेल्या हवाई हल्ल्याच्या संदर्भात मोठी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अल-जजीराच्या बातमीनुसार या मुरिदकेच्या मदरशात जर काही मिनिटांच्या आधी भारताचा एअर स्ट्राईक झाला असता तर एकाच वेळी लष्करचे ३००० अतिरेकी एकाच जागीच ठार झाले असते. एक मिनिटांच्या विलंबनाने बहुतांशी अतिरेकी वाचल्याचे अल-जजीराने म्हटले आहे. पाकिस्तानात मुरिदके प्रांत लष्कर -ए-तैयबाचा गड म्हटला जातो. येथेच लष्करच्या अतिरेक्यानां प्रशिक्षण दिले जाते.येथून प्रशिक्षित झालेल्या अतिरेकी आंतक वाद पसरविण्यासाठी कश्मीरच्या दिसेने दिसतो.
अल-जजीरा च्या मते मुरिदके परिसरात हाफीज सईचा एक मदरसा आहे. एक आरोग्य केंद्र आणि मस्जिदची निर्मिती केली आहे. याशिवाय याच मुरिदकेत एका कॉलनीची उभारणी केली आहे. येथे पाकिस्तान सरकारचे सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना येथे ठेवले जाते. सुमारे ३०० कुटुंबं या इलाक्यात रहात आहेत. मुरिदके येथे एका मदरसा असून त्यात ३००० हुन अधिक मुलांना शिकवले जाते. या मुलांना सकाळी फिजिकल ट्रेंनिग दिली जाते. यानंतर जिहादचा अर्थ सांगितले जात आहे. मदरशात राहणारे एक मौलाना यांनी अल-जजीरा सांगितले की येथे तीन दशकांहून अधिक काळ मुलांचे शिक्षण दिले जाते. मौलानाने हाफीजच्या मदरशात अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचा आरोप खोडून काढला आहे.
मात्र भारतीय हल्ल्या पूर्वी सर्वांनी हा मदरसा सोडावा असे फर्मानपाकिस्तान सैन्याने काढले होते.येथून अनेकांना जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले म्हणून ते वाचले नाही तर तेही गेले असते.