भारतात क्रिकेट च्या झटपट फॉर्म्युला म्हणजे टी ट्वेन्टी ची स्पर्धा त्यास भारतात इंडियन प्रीमिअर लीग म्हणतात.
अभिनेते,उद्योगपती हे राज्याच्या नावा वर खेळाडूंची बोली लावत संघ निवडतात व त्यांच्यात गुण फेरी नुसार सामने रंगतात तिकीट विक्री जाहिरात व प्रक्षेपणाचे हक्क यातुम खरबो रुपयांची उलाढाल होते.
२०२५ यावर्षी चा आयपीएल हा १८ वा मोसम असून या मोसमात आता काही सामने शिल्लक असतांना अचानक भारतात पाकीस्थान च्या दहशतवादयांनी २६ पर्यटक गोळ्या घालून ठार केले.
मग युद्ध जन्य परिस्थिती निर्माण झाली आशा अवस्थेत दिल्ली विरुद्ध पंजाब सामना सुरू असताना थांबवण्यात आला.आय पी एल संघ हा संमिश्र असतो त्यात विदेशी खेळाडू चा समावेश असतो. त्यामुळे स्पर्धाच स्थगित झाल्याने विदेशी खेळाडू। मायदेशी परतत होते.
खरं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे धरमशालाच्या मैदानावर पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सचा सामना अचानक रद्द करण्यात आला होता. यानंतर सर्व खेळाडूंना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं होतं.त्याचेवळी परदेशी खेळाडूंनी आपल्या घरी परतण्याची मागणी देखील केली होती.आणि ही मागणी मान्य देखील झाली. त्यानुसार सर्व खेळाडू विमानात बसण्याची तयारी करत होते.पण या खेळाडूना पंजाबचा प्रशिक्षक रिकी पॉटींग याने एक फोन कॉल करून भारतातच रोखले होते.
मार्कस स्टॉईनिस,जोश हेझलवूड,आरोन हार्डिसारखे ऑस्ट्रेलियन खेळाडू विमान पकडण्यासाठी जात होते. पण त्याचवेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी करण्यात आली. ही गोष्ट रिकी पॉन्टिगला कळताच त्याने झटपट पाऊले उचलायला सूरूवात केली. पॉन्टिगने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना फोन केला आणि भारतामध्ये राहण्याचे आवाहन केले. त्यामुळे खेळाडूंनी पॉन्टिगचे म्हणणे एकूण भारतात राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकट्या पॉन्टिंगमुळे खेळाडू मायदेशी जाण्याचे थांबले व त्यांचा हेलफाटा वाचला.