भारत व पाकिस्तान मधील युद्ध होणार अशी स्थिती होती भारताने पाकिस्थान ला चांगलाच धडा शिकवला होता.त्याचे सर्व वार परतवून लावले होते शेकडो पाकिस्थानी दहशतवादी ठार केले.पण जर युद्ध पेटले अन दोन्ही देशा कडून अनु शक्ती (अणुबाँब) चा वापर करण्यात आला तर मोठा विनाश होईल व तो जगाला न परवडणारा असेल असे म्हणत अमेरिका राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प याने भारत व पाकिस्तान ला शस्त्र संधी करण्याचे सांगितले व स्वतः च घोषणा देखील केली.अन दोन्ही कडून तणाव निवळला.
मात्र आता देशांतर्गत सोशिअल मीडिया वार सुरू आहे,इंदिरा गांधी असत्या तर नसत्या तर त्यावेळी काय चुका झाल्या असे युद्ध अंध भक्त विरुद्ध चमचे असे भडकले असून यात भाजप चा आय टी सेल व काँग्रेस चा ही आय टी सेल देशभर खाद्य पुरवतो आहे.धार्मिक विद्वेष पसरवण्यात यावा असा मनसुभा दहशतवादी वृत्ती चा होता त्यामुळे धर्म विचारून गोळ्या मारण्यात आल्या पण हवा तसा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. आता पुढील अनेक दिवस विरांचे बलिदान विसरून सोशिअल मीडियातून वार सुरूच ठेवतील यात मध्यस्थी करणारा एखादा ट्रम्प आजून तरी निर्माण झाला नाही.