कामगारांच्या हक्कांसाठी आता
न्याय दो आंदोलन
जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे आंदोलन…
सतत कामगार,निराधार,शेतकरी, शेतमजूर,दिव्यांग यांच्या प्रश्नांची जाण ठेऊन लढा देणारे व त्यांच्या हिता साठी विविध उपक्रम राबविणारे यवतमाळ जिल्हा शिवसेना उप जिल्हा प्रमुख डॉ.विष्णू उकंडे आता कामगारांच्या हक्का साठी न्याय दो आंदोलन पुकारत असून त्यांचे हे आंदोलन यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालया समोर होत आहे.यापूर्वी त्यांनी गावा गावात जवाब दो आंदोलन केले होते.
राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा मध्ये नोंदणीसाठी ग्रामसेवकाची सही आवश्यक आहे,
परंतु सद्या ग्रामसेवक सही देत नसल्याने हजारो बांधकाम कामगार शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित राहत आहेत. या गंभीर समस्येला वाचा फोडण्यासाठी २६मे २०२५ रोजी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे न्याय दो आंदोलनाचे आयोजन कामगार व उद्योग समिती यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ विष्णू उकंडे यांनी दिली आहे.
हा मोर्चा प्रखर कामगार नेते डॉ. विष्णू उकंडे यांच्या नेतृत्वात आणि पुढाकाराने घेण्यात येत असून यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील हजारो बांधकाम कामगार सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा यासंदर्भात स्पष्ट शासन निर्णय असून उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या देखील स्पष्ट मार्गदर्शक सूचना आहेत की, बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेली ग्रामसेवकांची सही देणे अनिवार्य आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक ग्रामसेवक हे त्यांच्या युनियनच्या दबावाखाली सह्या देण्यास नकार देत आहेत. यामुळे कामगारांचे नोंदणी प्रक्रियेत अडथळे येत असून, त्यांना आर्थिक, आरोग्य, सामाजिक व शैक्षणिक योजनांचा लाभ मिळत नाही.
त्याच प्रमाणे यवतमाळ जिल्ह्यात आजपर्यंत कामगार विभागाने एकही घरकुल दिले नाही ते देण्यात यावे,पेटी व डिनर सेट वाटप सुरू करून शेवटच्या व्यक्ती पर्यंत लाभ द्यावा, कामगार अधिकारी महिन्यातून फक्त १ ते २ दिवस च यवतमाळ कार्यालयात येतात,कायम फोन फॉरवर्ड केलेला असतो त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याला
नियमित कामगार अधिकारी द्यावा
तसेच विविध कल्याणकारी योजना विलंब न करता तत्काळ मंजूर करण्यात याव्या
या वरील मागण्या मान्य होऊन बांधकाम कामगारांना त्यांचे हक्क मिळावेत या मागणीसाठी कामगार व उद्योग समिती यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने न्याय दो आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असून पोस्टल ग्राउंड ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती डॉ विष्णू उकंडे यांनी दिली आहे.
कामगारांच्या न्यायहक्कांसाठीचा हा लढा निर्णायक ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने कामगारांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ.विष्णू उकंडे यांनी केले आहे.