त्या लेआउट च्या सांडपाण्याच्या नालीसाठी नागरीक घडकले आर्णी नगरपरिषेदवर….
राष्र्टवादी काॅग्रेस पक्षाच्या महीला अघाडीच्या
उपाध्यक्षा रंजना आडे यांनी…
अमरण उपोषनाचा दिला ईशारा…..
आर्णी येथील नगरपरिषद कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असते अशातच येत्या काही दिवसातच पावसाळा सुरु होणार आहे.मात्र नगर परिषेदेने मानसुन पुर्वी कामे केली नव्हती अशातच आर्णी शहराच्या मघ्य भागी शिवनेरी चौकाच्या हाकेच्या अंतरावर असलेले सायराबाई लेआउट मध्ये २०/२५ प्लॉट असून प्लॉटवर गेल्या अनेक वर्षापासून येथील रहिवाशांना सांडपाण्याचे त्रास भोगवा लागत आहे या लेआउट मध्ये कुठलीही नालीची सोय नसल्यामुळे अनेकांच्या घराच्या बाथरूमचे सांडपाणी रस्त्यावरुण येत आहे. या सांडपाण्याचा रहिवाशी असणाऱ्या लोकांना त्रास जाणवत आहे. व या सांडपाण्यावर बसणाऱ्या मच्छरांचा सुद्धा या लेआउट मधील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे व खराब पाण्याचा दुर्गंध सुद्धा सहन करावा लागत आहे वारंवार नगरपरिषद ला अर्ज देऊनही अद्याप सायराबाई लेआउट मध्ये नालीचे बांधकाम करण्यात आले नाही या पुर्वीही पब्लिक पोष्ट वुत्तपत्राने सुद्या दखल घेतली होती.तरीपण संबधित अधिकार्यांना घाम फुटला नाही.आता या १५ दिवसाच्या आत सायराबाई लेआउट मध्ये नाली देऊन व नालीचे बांधकाम करण्यात यावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन व लगेच उपोषण आपल्या नगर परिषद कार्यालया समोर करण्यात येईल या आंदोलनाची व उपोषणाची जबाबदारी शासनावर राहील याची दक्षता आपण घ्यावी,असा ईशारा राष्र्टवादी पक्षाच्या महीला अघाडीच्या उपाध्यक्षा रंजना आडे यांनी दीला.निवेदन देता वेळी सायराबाईले आऊट मधील समस्त बंधु आणी भगीणी ऊपस्थित होते…..