भारताचे दोन दिग्गज खेळाडू स्टार फलंदाज कर्णधार रोहित शर्मा व विक्रमादित्य विराट कोहली यांनी एका पाठोपाठ कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती ची घोषणा केली ती अशा वेळी जेव्हा भारत इंग्लंड मध्ये सामने होणार आहेत
विराट कोहली कसोटीतील आपल्या १० हजार धावा पूर्ण करणे बाकी आहे तरीही त्याने असा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या दोन फलंदाजा ची पोकळी भरून काढण्याचे आवाहन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या समोर होते.मात्र त्यांचा शोध संपला असून दोन नवोदित युवा खेळाडूंना आता भारतीय संघात संधी मिळण्याची संधी व श्यक्यता आहे.या दोघांनीही प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये सातत्याने धावा केल्या आहेत.
अलिकडेच, भारतीय क्रिकेट संघातील दोन मोठे स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटीतून निवृत्ती घेतली. या दोन्ही दिग्गजांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली.
निवडकर्त्यांना लवकरच या दोघांसाठी पर्यायी खेळाडू शोधावा लागेल. टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
आगामी मालिकेत रोहित आणि कोहलीच्या जागी ज्या दोन खेळाडूंना संघात स्थान मिळू शकते त्यात अभिमन्यू ईश्वरन आणि सरफराज खान यांचा समावेश आहे.
अभिमन्यू ईश्वरन हा भारतातील निवडक खेळाडूंपैकी एक आहे, जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे. पण त्याला अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करता आलेले नाही.
उजव्या हाताचा सलामीवीर फलंदाज बंगालकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. त्याने आतापर्यंत १०१ प्रथम श्रेणी सामने खेळले.
त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक द्विशतकही आहे. या खेळाडूने बिहारविरुद्ध 233 धावांची खेळी खेळली होती. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो रोहित शर्माच्या जागी भारताकडून सलामीला येऊ शकतो.
दुसरीकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा काढल्यानंतर मुंबईच्या सरफराज खानला गेल्या वर्षी भारतासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. आतापर्यंत सरफराजने ६ सामन्यांच्या ११ डावात ३७१ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याची सरासरी ३७.१० होती.
२७ वर्षीय या खेळाडूने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. १५० ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
विराट कोहलीच्या जागी चौथ्या क्रमांकावर सरफराज खान हा एक चांगला पर्याय असू शकतो. अशा परिस्थितीत, भारतीय निवड समिती इंग्लंड मालिकेसाठी युवा फलंदाजाचा संघात समावेश करू शकते.