आय पी एल चा मोसम संपला की लगेच भारतीय संघ इंग्लंड च्या दौऱ्यावर जाणार आहे तेथे दोन्ही संघात ५ कसोटी सामने होणार आहेत मात्र यावेळी भारतीय संघ कसोटी ची मालिका रोहित शर्मा व विराट कोहली शिवाय खेळणार आहे.त्यामुळे भारतीय संघाची एक प्रकारची कसोटी ठरणार आहे.
त्याआधी भारताचा ‘अ’ संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, त्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे.
यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल आणि शार्दुल ठाकूर ते हर्षित राणा या प्रसिद्ध खेळाडूंचा या संघात समावेश करण्यात आला आहे.
शुभमन गिल देखील या संघाकडून खेळेल, पण त्याला यावेळी कर्णधारपद मिळालेले नाही.
टीम इंडिया-अ ला इंग्लंड लायन्स विरुद्ध २ प्रथम श्रेणी सामने खेळायचे आहेत, जे ३० मे पासून सुरू होणार आहेत.
रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीनंतर भारताच्या कसोटी संघाच्या नवीन कर्णधाराचा विषय चर्चेत आला होता.
कर्णधारपदासाठी शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांची नावे आघाडीवर आहेत, परंतु इंडिया-अ चे नेतृत्व गिल किंवा बुमराह यांना नाही तर 29 वर्षीय अभिमन्यू ईश्वरन यांना देण्यात आले आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी दरम्यान भारतीय संघाचा भाग असलेल्या अभिमन्यू ईश्वरनला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती हे विशेष.