भारताचा स्टार फलंदाज व यशस्वी कर्णधार भारतीय क्रिकेट च्या दुनियेत अनेक विक्रम रचनांरा रो ‘हिट’ ,शर्मा मैदानावर एकदम शांत असतो तो कसोटी,एकदिवसीय व टी ट्वेन्टी प्रकारात आवश्यकते नुसार संयमी,आक्रमक फलंदाजी करतांना पहायला मिळत होता आता मात्र त्याने अचसंक कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर करून सर्वानाच धक्का दिला.
तरीही त्याच्या यशस्वी करकीर्दी चा विचार करून व त्याच्या भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून मुंबई च्या वानखेडे स्टेडियम वरील एका स्टॅण्ड ला त्याचे नाव देण्यात आले.
भारताच्या वनडे क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला शुक्रवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सन्मानित करण्यात आलं. ज्या स्टेडियमवर खेळून रोहितने आपल्या करिअरची सुरुवात केली त्याच स्टेडियमवरील एका स्टॅन्डला रोहित शर्माचं नाव देण्यात आलं. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून वानखेडेवर आयोजित करण्यात आलेल्या उदघाटन कार्यक्रमाला रोहित सह कुटुंब पोहोचला होता. यावेळी त्याचे आईवडील, भाऊ वाहिनी, पत्नी इत्यादी उपस्थित होते. मात्र कार्यक्रमानंतर स्टेडियमबाहेर पडताना रोहित शर्माचा अँग्री ब्रदर अंदाज सर्वांनी पाहिला. कारवरील डेंट पाहून रोहितने आपल्या लहान भावाला झापलं.
वानखेडेवरील रोहित शर्माच्या स्टॅन्डचं उदघाटन रोहितच्या आई वडिलांच्या हस्ते करण्यात आलं. याक्षणी त्याचं सर्व कुटुंब हे भावुक झालं होतं आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. कार्यक्रम संपल्यावर मुंबई इंडियन्सच्या टीम सोबत रोहितला सराव सुरु करायला होता, यासाठी तो आपल्या कुटुंबाला गाडीजवळ सोडायला गेला. त्यावेळी त्यानं पाहिलं की त्याचा कारच्या मागच्या बाजूला डेंट पडला होता. कारवरील डेंट पाहून त्याने मजेशीर अंदाजात लहान भाऊ विशालला विचारलं, ‘हे काय आहे?’ यावेळी विशालने त्याला सांगितले की, ‘पार्किंग करताना रिवर्स घेत्यावेळी कारच्या मागच्या बाजूस डेंट आला आहे’. मग रोहितने विचारलं, ‘कोणामुळे, तुझ्यामुळे का?’ यावर लहान भावाने होकारार्थी उत्तर दिल्यावर, रोहित भडकला आणि तो म्हणाला ,’डोकं कुठे असतं तुझं?’. रोहित शर्मा हा कार लव्हर असून त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.