संजय राठोड हे आज सलग पाचव्यांदा दिग्रस दारव्हा नेर चे आमदार म्हणून निवडून आले दरवेळी विविध वयक्तिक मुद्दे उकरून संजय राठोड यांच्या विरुद्ध अप प्रचार केला पण विरोधकांना चारी मुंड्या चित करून त्यांनी भगवा फडकवलाच आणि मंत्रिमंडळात सन्मानाणे स्थान निर्माण केला.
पण जमिनीवर असलेला हा नेता आपल्या सहकारी पदाधिकारी शिवसैनिक यांची काळजी घेतात म्हणूनच लाखो लोकांच्या गळ्यातले ताईत आजही शिवसैनिकास जपत स्व.,हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वसा व वारसा संजय भाऊ राठोड चालवत आहेत.
यवतमाळ महानगरीत प्रथमच आगमन झाल्यानंतर सर्व प्रथम गिरिशभाऊ व्यास यांच्या निवासस्थानी सायकलने प्रवास करून गिरिशभाऊ व्यास यांची भेट घेतली.
जेष्ठ शिवसैनिक गिरिशभाऊ व्यास यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा व मला कॅबिनेट पद मिळावे यासाठी यवतमाळ ते तुळजापूर सायकलनने ४०० कि. मी. प्रवास करून आई तुळजा भवानी ला साकडे घातले होते.आई तुळजा भवानी मातेच्या कृपेने आज सगळी मनोकामना पूर्ण झाल्यानंतर त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले….
संजू भाऊ मंत्री असून सायकल चालवत भेटीला आले हे पाहून गिरीश भाऊ व्यास गहिवरले. ही घटना ६ जानेवारी २०२०। ची आहे.