बोगस बियाणे व फवारणी औषध विक्री विरोधात मनसे आर्णी आक्रमक
▪️उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर;
▪️कारवाई न झाल्यास २०१७ सारखं आंदोलन पुन्हा उभारण्याचा इशारा
आर्णी तालुक्यातील बोगस बियाणे व बंदी असलेल्या फवारणी औषधांची खुलेआम विक्री होत असल्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आर्णी आक्रमक पवित्रा घेतला आहे. उपविभागीय अधिकार यांना निवेदन देत या प्रकारावर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा २०१७ सारखे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ‘आशीर्वादाने’ शेतकऱ्यांची फसवणूक? निवेदनात म्हटले आहे की, आर्णी तालुक्यातील खरिपाच्या हंगामात सुमारे 2 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. मात्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात व मध्य प्रदेश येथून मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे आर्णी तालूक्यात येत असून, स्थानिक कृषी अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय ही बियाणे विक्रीसाठी येणे शक्य नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भरारी पथक फक्त दिखावा, कारवाई रसदपुरवठ्यानुसार? कृषी विभागाने तयार केलेली भरारी पथके ही केवळ थातुरमातुर कारवाई करत असून, आर्थिक रसद नसलेल्या कृषी केंद्रांवरच केवळ कारवाई केली जाते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संपूर्ण तालूक्यात छापे टाकण्याची मागणी या पार्श्वभूमीवर मनसे आर्णी सेनेने तालूक्यातील सर्व कृषी केंद्रांवर छापे टाकून गोडाऊन तपासणी करण्याची जोरदार मागणी केली आहे. तसेच बोगस बियाणे व बंदी असलेली फवारणी औषधे जिल्ह्यात आली कशी, याची सखोल चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली.
२०१७ ची घटना आणि मनसेचे आंदोलन लक्षात ठेवा! २०१७ साली जिल्ह्यात बंदी असलेल्या फवारणीमुळे विषबाधेने २३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मनसेने आंदोलन केले करत १७ दिवस तुरुंगवासही पत्करला होता. या घटनेचा पुनः उल्लेख करत प्रशासनास इशारा दिला की, योग्य ती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन पुन्हा उभारले जाईल.
निवेदन देताना हे पदाधिकारी होते उपस्थित:
आदी पदाधिकारी उपस्थित होते.
“शेतकऱ्यांचे जीवन आणि हक्क यांच्याशी खेळणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास २०१७ ची पुनरावृती होईल .” —
सचिन येलगंधेवार , मनसे तालुका अध्यक्ष ,आर्णी