प्रशासन चालवण्यासाठी यंत्रणा असते त्यास आपण शासन म्हणतो ही यंत्रणा राबविण्यासाठी एक प्रमुख अधिकारी असतो वेगवेगळ्या प्रशासकीय विभागाने जनतेला सेवा द्यावी ,त्यांचे प्रश्न समस्यां सोडवाव्यात म्हणून जो प्रमुख असतो तो जर संवेदनशील मनाचा असला तर जनसेवेची कामे जलदगतीने पार पडतात हा अनुभव आहे.
महसूल विभाग हा सर्वसामान्य माणसाशी निगडित असतो येथे प्रमुख खुर्चीवर बसलेला माणूस म्हणजे तहसीलदार असाच एक संवेदनशील मनाचा अधिकारी नव्हे माणुसकी जपणारा माणूस आर्णीस लाभला आहे.
वैशाख वाहुरवाघ हे आर्णीत रुजू झाल्या पासून आपण जगाच्या वेगळे नाही हे त्यांनी नुसते दाखवलेच नाही तर ते कृतीतून देखील वारंवार सिद्ध केले.ते नेहमी सांगतात “लोकांचे काम करण्यासाठी सरकार पगार देते ते माझे कर्तव्य आहे”
तहसीलदार म्हणून जबाबदारी पार पाडतांना ”समाजाचे आपणास देणे लागते” हे ते वारंवार सिद्ध करतात नव्हे कृतीतून दाखवून देतात.कधी ते दुर्गम भागात जाऊन शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवितात पारधी समाज बांधवांच्या व्यथा जानतात…त्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून सर्व कागदपत्रे दाखले देतात वंचित घटकांचे जीवन सुकर व्हावे म्हणून काम करतात.कधी अनाथ दिव्यांगाच्या मदतीला धावतात. कधी लहान मुलांच्या चेहऱ्यावर हसू यावे म्हणून त्यांना नवे कापड घेऊन देतात तर कधी खाऊ देतात
कार्यालयात आलेल्या प्रत्येक नागरिकांना आपले वाटावे असे हे साहेब लोकांसाठी आता माणुसकीचा ,वाहणारा अखंड झरा आहे.महसूल संदर्भात कुठलेही काम असो आपल्या सहकारी अधिकारी कर्मचारी यांना अतिशय सौजन्याने कामे दरदिवशी हाता वेगळे करतात.शासन आपल्या फोन वर ही संकल्पना यवतमाळ जिल्हाधिकारी मीना यांनी राबविण्यात यावी हे जेव्हा ठरवले तेव्हा वैशाख वाहुरवाघ यांनी सर्वात महत्वाची असलेली ‘संजय गांधी निराधार योजने’ विषयी अत्यन्त सोप्या सरळ भाषेत व्हिडीओ करून दिली.
अधिकारी येतात जातात काही खुर्चीवर बसून साहेबगिरी चा थाट मिरवतात तर वैशाख वाहुरवाघ त्यास अपवाद म्हणावे लागेल प्रेम,आपुलकी,विनयता व संवेदनशीलता याचा अनोखा समंध खुर्चीतल्या या तहसीलदार असलेल्या व्यक्तीत दिसून येतो.
एक म्हातारी आजी तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांच्या नजरेस पडते ते तिच्या जवळ जातात अन विचारतात “आजीबाई काय अडचण आहे” मोठा सहीब आपणास विचारतो म्हणून ती पाणावलेल्या डोळ्यांनी व्यथा सांगते “मुलगा सून नाही पण एक मुलगा एक मुलगी नात मी सांभाळते”पण आता वय झाले आजीबाई च्या व्यथा जाणून तहसीलदार आपल्या सहकार्यांना सांगतात ‘या आजीबाईंना सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा’ एव्हढेच सांगत नाहीत तर त्या मुलांना मायेने जवळ घेत नवीन कापड चप्पल घेऊन देतात सोबत खाऊ घेऊन आपल्यातला तहसीलदार तर जपतात सोबत माणुसकी देखील देखील जोपासतात.त्या आई वडिलांचे छत्र नसलेल्या मुलांना मायेने जवळ घेतात
हे सर्व त्यांची स्तुती नसून माणुसकी व संवेदनशीलता जपणारा अधिकारी आर्णी तहसील ला तहसीलदार म्हणून लाभला असे म्हणावे लागेल.सामाजिक संवेदनशीलता व माणुसकी जोपासणाऱ्या तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांना बोल महाराष्ट्र चा सलाम