सत्ताधीश व प्रशासन हे राज्य कारभार चालवण्यासाठी एका गाडीचे दोन चाक असतात पण सत्ता धारी सेवक ऐवजी स्वतःला मालक समजू लागतात त्यामुळेच त्यांची मुजोरी व मन मानी सुरू असते प्रशासनातील काही अधिकारी देखील वाम मार्गाने कमाई साठी सत्ताधारी लोकांचे गुलाम बनून राहतात पण काही अधिकारी हे स्वाभिमानी असतात अशाच एका स्वाभिमानी आय पी एस अधिकाऱ्याने (कर्नाटक) आपल्या पदाचा राजीनामा सरकार कडे फेकला आहे.देशात असे जर सनदीअधिकारी असले तर व्यवस्था दुरुस्त होण्यास साहाय्य लागणार नाही.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पोलीस अधिकारी बारमणी यांच्यावर हात उगारला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एप्रिल महिन्यात एका मोर्चात बंदोबस्ताला असलेल्या पोलीस अधीक्षकावर हात उगारला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर विरोधकांनी टीका केली. मात्र याचा धसका संबंधित पोलीस अधिकाऱ्यानेच अधिक घेतला. अतिरीक्त पोलीस अधिक्षक एनव्ही बारमणी यांनी या घटनेनंतर जूनमध्ये स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला. त्यांच्या अर्जावर अद्याप कर्नाटक सरकारने निर्णय घेतलेला नाही.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एप्रिल महिन्यात एका मोर्चात बंदोबस्ताला असलेल्या पोलीस अधीक्षकावर हात उगारला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर विरोधकांनी टीका केली. मात्र याचा धसका संबंधित पोलीस अधिकाऱ्यानेच अधिक घेतला. अतिरीक्त पोलीस अधिक्षक एनव्ही बारमणी यांनी या घटनेनंतर जूनमध्ये स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला. त्यांच्या अर्जावर अद्याप कर्नाटक सरकारने निर्णय घेतलेला नाही.
बारमणी यांनी १४ जून रोजी गृह सचिवांना पत्र लिहून २८ एप्रिलच्या घटनेबद्दल अतीव दुःख व्यक्त केले. काँग्रेसतर्फे महागाईच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाजपाच्या महिला कार्यकर्त्या थेट स्टेजवर आल्या. भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी निदर्शने केल्याने संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक बारमणी यांच्यावर भरसभेतच हात उगारला.
बारमणी यांनी गृह सचिवांना लिहिलेल्या पत्रात या घटनेचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाल्याचे म्हटले. त्यांनी लिहिले की, सिद्धरामय्या सर्वांसमोर माझ्या अंगावर धावून आले. इथला एसपी कोण आहे? असे म्हणून त्यांनी माझ्यावर हात उगारला. मी तात्काळ मागे हटलो त्यामुळे त्यांची थापड चुकविण्यात यशस्वी झालो. मी थापड जरी चुकवली असली तरी माझी बदनामी मात्र थांबवू शकलो नाही.