मुंबईत वरळी डोम येथे जणू काही दिवाळी सण साजरा होत आहे.हिंदी भाषा सक्ती विरुद्ध सरकार विरुद्ध मनसे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकत्र येऊन विरोध करत होती हा एक महत्वाचा धागा जुळला असून तब्बल १९ वर्षा नंतर उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र एका व्यासपीठावर येत आहे.तसे हे दोन्ही बांध पारिवारिक कार्यक्रमात एकत्र येत होते पण राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली.सुरवातीला १४ आमदार व नाशिक महानगर पालिकेची सत्ता काबीज केली होती.
सरकारने हिंदी सक्ती चा अध्यादेश जरी रद्द केला असला तरी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी जाहीर सभा वरळी डोम येथे आयोजित केली आहे येथे महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून मराठी माणूस शिवसैनिक व मनसैनिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत.