केवळ उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे बंधू एकत्र आले नाहीतर उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे व राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित हे दोघे भाऊ व्यासपीठावर एकत्र येत आलिंगन दिले यावेळी तेजस ठाकरे देखील उपस्थित होते. सोबतच उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे,राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे एकत्र पहायला मिळाल्या पूर्ण परिवाराचे मनोमिलन झाले यावेळी एकत्रित फोटो शेषण झाले.आजच्या कार्यक्रमा साठी खा.सुप्रिया सुळे, महादेव जानकर शेकाप चे जयंत पाटील,आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते वरळी डोम येथे झालेल्या कार्यक्रमात खा.संजय राऊत मनसे चे बाळा नांदगावर व मनसे शिवसेना उबाठा चे नेते उपस्थित होते.
