बिड हे आर्णी तालुक्यातील एक दुर्लक्षित गाव येथे नागरी सुविधांचा अभाव आहे.गावात अंगणवाडी इमारत अर्धवट अवस्थेत आहे.सार्वजनिक शौचालय देखील मोडकळीस आलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागते त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू असल्याने अंगणवाडी मधील मुले कुठे बसून शिक्षण घेतील हा प्रश्न आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण गावातील पक्के रस्ते खोदून ठेवले त्यामुळे गावात चिखलच चिखल झाला आहे.
या सर्व समस्यां कडे प्रशासनाने लक्ष देऊन समस्या सोडवाव्या यासाठी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
या निवेदनावर गावातील राजू देवकर,प्रभू पवार,लक्ष्मण देवकर,राधेश्याम थरकडे, भावराव देवकर,ज्ञानेश्वर गुडे, बंदु मिरासे,अशोक मिरासे,उत्तम वाकडे, दत्ता थरकडे,गजानन दावणे,किसन पवार,संगीता माने,शंकर देवकर,गोपाल जुडे,गजानन जाधव,योगेश देवकर,दिलीप माने,राजू साखरकर, भारत शिंदे,युवराज देवकर, बाबाराव शिंदे,राजू रामटेके,गजानन चांदोडे, भारत थरकडे आदी ग्रामस्थांनी स्वाक्षरी केली आहे.आता प्रशासन काय पाऊल उचलून समस्यां कशा निकाली काढते याकडे लक्ष लागले आहे.