साप नाव ऐकले तरी घाबरगुंडी उडते साप दिसला तर पाचावर धारण उडते. सर्वच साप विषारी नसतात साप हा शेतकऱ्यांना मदत करतो म्हणून तो शेतातील उंदीर खाऊन एका प्रकारे मदतच करतो पन साप चावून मृत्यू होण्याच्या घटना दरवर्षी होतात त्यातील काही सर्पदंश झाल्यानंतर वेळीच उपचार मिळाले तर जीव देखील वाचतो.
सापाला नागरी वस्ती मधून जिवंत पकडून त्यांना सुरक्षित अधिवासात सोडण्याचे काम सर्प मित्र करतात साप पकडणे हे एक कौशल्य असून त्याचे प्रशिक्षण निष्णात सर्पमित्रा च्या मार्गदर्शनात घ्यावे सापाच्या जाती ओळखणे,विषारी व बिनविषारी अशी वर्गवारी करत जागृती करणे हे काम सर्पमित्र करतात पण हे जोखमीचे काम असून सर्पमित्रास कुठलेच संरक्षण कवच नसते.जीव धोक्यात घालून लोकांचे जीव वाचवणारे व सापांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्रांना कधी कधी आपले प्राण गमवावे लागते.
काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध सर्पमित्र मुरली यास कोब्रा सापाने चावल्याने त्यांचा प्राण जाता जाता वाचला होता.आता एका सर्पमित्राने भारतीय नागास रेस्क्यू करून तो आपल्या गळ्यात घातला मात्र सर्प दंशाने त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
दीपक महावर या व्यक्तीने मध्यप्रदेशच्या गुना जिल्ह्यात आजवर अनेक सापांना जीवदान दिलं. पण सोमवारी एका इंडियन कोब्राला वाचवताना एक चूक केली, जी त्यांना चांगलीच महागात पडली. सापाला वाचवल्यानंतर बाईकवरून जाताना तो साप स्वत:च्या गळ्यात गुंडाळून ठेवला. अखेर या व्यक्तीला त्याचा जीव गमवावा लागला. कोब्रा सापाने त्यांना चावा घेतला, यानंतर उपचार मिळून देखील महावर यांचा काही तासातच मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
जेपी कॉलेजमध्ये पार्ट-टाईम कामगार असलेल्या ३५ वर्षीय महावर यांनी स्वतःच सापांना हाताळण्याची कला शिकून घेतली होती. आणि ही मृत्यू होण्याच्या काही काळ आधी त्यांनी कोब्रा साप स्वत:च्या गळ्याभोवती गुंडाळून एक व्हिडीओ देखील काढला होता.
रील चा ट्रेंड बेतत आहे जीवावर:
आज इंस्टा, फेसबुक व यु ट्यूब वर कमाई च्या नादात रील ची स्पर्धा पहायला मिळते विव्ह, लाईक कमेंट,फालोअर्स वाढविताना आता सर्पमित्र सोबत कॅमेरा घेऊन जातात हे सेवा ठीक असले तरी जीवघेणे स्टंट केला तर जीव जाण्याचे प्रकार घडत आहेत हा प्रकार चिंताजनक असून सर्पमित्रानी या संदर्भात काळजी घेतली पाहिजे.