7k Network

लाचेचा मोह सुटला,घडा अखेर भरला सापळ्यात अडकला उपअभियंता….

कुठलेही काम हे निकृष्ट दर्जाचे होते म्हणून ओरड असते त्याचे कारण म्हणजे कंत्राटदाराला अधिकारी वर्गास द्यावी लागणारी लाच हे प्रमाण एव्हढे वाढीस लागले की यातून बेहिशोबी मालमत्ता जमा करण्याचा मोह अधिकारी वर्गास सुटत नाही.जणू काही त्यांच्यात वर कमाई ची स्पर्धाच लागल्याचे चित्र दिसून येते.

लाच घेणे व देणे हा गुन्हा आहे पण कायदा पाळल्या जात नाही म्हणून लाच खोर वृत्ती विरुद्ध कारवाई करण्यासाठी स्वतंत्र लाच लुचपत नियंत्रण विभाग आहे.मात्र या विभागाचे कारवाईत आजवर हजारो अधिकारी कर्मचारी जाळ्यात अडकतात तरीही लाच घेण्याचा मोह सुटता सुटत नाही.देशाचे पंतप्रधान म्हणाले  होते की ना खाऊंगा,ना खाणे दुगा …तरीही टेबला खालून लाच घेणारे धाडस करतात.मात्र एखादा लाच न देता अशा प्रवृत्ती विरुद्ध धाडस करतो मग त्या अधिकारी अथवा लाच घेणाऱ्या च्या पापा चा घडा भरतो.काही दिवसांपूर्वी तर एका आमदाराला मध्यप्रदेश मध्ये लाच घेताना अटक करण्यात आली होती.

लाच घेण्याची अशीच एक घटना आर्णीत घडली एक उपअभियंता जो स्वतःला एका बिड च्या राजकीय नेत्याचा माणूस म्हणून बिनधास्त लाच घेत  होता.तोही रुबाबात लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या सापळ्यात अडकला

 

कामाचे २ % रक्कम  मागणे उपअभियंत्याच्या चांगलेच अंगलट आले.

लाचलुचपत विभागाने पकडले रंगेहाथ

 

जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग आर्णी येथील अभियंत्याला कामाचे 2 % कमिशन मागणे चांगलेच महागात पडले आहे चक्क कमिशनचे पैसे घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ च्या पथकाने अभियंत्याला रंगेहाथ पकडले आहे संतोष भगवानराव क्षिरसागर, वय ५३ वर्ष, पद उप अभियंता, नेमणुक जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आर्णी व खाजगी व्यक्ती सागर शंकरराव भारती, वय २७ वर्षे यांना दोघांना ताब्यात घेतले आहे
तक्रारदार आर्णी तालुक्यातील एका गावाचा सरपंच असून गावामध्ये स्मशान भुमीचे सुशोभिकरणाचे काम पुर्ण केले होते. सदर कामाचे बिल काढणेकरीता कामाची पाहणी करून काम पुर्ण झाल्याच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी घेणेकरीता यातील तकारदार यानी लोकसेवक यांची भेट घेतली असता, यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांना कामाच्या १० लाख रू. मंजुर रकमेच्या २ टक्के प्रमाणे २०,०००/- रू. लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांना लोकसेवकास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ला.प्र.वि. यवतमाळ यांचेकडे लोकसेवकाविरूध्द दिनांक १४/०७/२०२५ लाच मागणीची तकार दिली होती. लाचेच्या मागणीची पडताळणी दिनांक १५/०७/२०२५ रोजी केली असता यातील लोकसेवकाने नकारदार यांचेकडे २ टक्के लाचेची मागणी करून तडजोडी अंती १ टक्का म्हणजे १०,०००/- रू. लाचेची रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शविली होती. त्याअनुषंगाने आज रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान सायंकाळी १७.०० ते १८.३० वा. चे दरम्यान यातील आरोपीत लोकसेवक यांनी त्यांचे आर्णी येथील शासकिय कार्यालयात खाजगी ईसमाचे मार्फतीने लाच रक्कम स्विकारल्यानंतर त्यांना खाजगी ईसमासह ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस स्टेशन आर्णी येथे सविस्तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असुन सदर गुन्हयाचा तपास हा पोलीस निरीक्षक श्री. मनोज ओरके ला.प्र.वि.यवतमाळ हे करित आहेत.

सदरची कार्यवाही मा. श्री. मारूती जगताप, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, श्री. सचींद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, अमरावती, पोलीस उपअधीक्षक श्री. अभय आष्टेकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरके, पोलीस निरीक्षक श्री. अर्जुन घनवट आणि पोलीस अंमलदार पोहवा अतुल मते, अब्दुल वसीम, पोना सचिन भोयर, राकेश सावसाकडे, पोकों भागवत पाटील व चालक पोकों अतुल नागमोते सर्व नेमणुक अॅन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांनी केली आहे.

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ कार्यालयास दुरध्वनी क्रमांक ०७२३२-२४४००२ तसेच टोल फि कमांक १०६४ वर संपर्क करण्याचे आव्हान पोलीस उप-अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळ यांनी केले

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!