आर्णी शहरात आज सकाळी १० वाजता च्या सुमारास अचानक आर्णी यवतमाळ रोड वरील जाधव पेट्रोल पंप लगत च्या एका कॉम्प्लेक्स वर धाड पडली मात्र या धाडी बाबत अतिशय गोपनीयता पाळल्या गेली ही धाड आयकर विभागाची की विक्री कर विभागाची की विक्री व सेवा कर विभागाची या बाबत अजूनही संभ्रम कायम आहे बंद दरवाज्या आड काय घबाड सापडले याबाबत शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहे.देवा चा आशिष असे नाव असनाऱ्या या दुकानात होलसेल सिमेंट गज व इमारत साहित्य मिळत असल्याचे कळते.
काही माध्यमाच्या प्रतिनिधीने माहिती मागितली असता चौकशी सुरू असल्याचे त्या पथकाने सांगितले आहे.सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी सात ते आठ वाजेपर्यंत त्या दुकांनाची नेमकी काय चौकशी केली हे गुलदस्त्यातच असल्याची चर्चा रंगताना दिसून येत आहे.
लावलेलं सील का तोडले?
शिवाशीष एजन्सीचे गोडाऊन हे पाण्याच्या टाकीजवळ असल्याने पथकांनी त्या गोडाऊन वर जाऊन सर्वप्रथम दुकानाच्या शेटरला कागदी सील लावले मात्र तब्बल चार तासांनी पुन्हा लावलेले सील का तोडले हे समजणारे कोडेच म्हणावे लागेल अशी चर्चा शहरात चवीने चर्चिल्या जात आहे.
————————
जीएसटी विभागाची कमालीची गोपनीयता
अमरावती येथील जीएसटी विभागाची शहरातील शिवाशीष एजन्सी येथे धाड पडल्याची माहिती होताच काही मध्यम प्रतिनिधी चार तासानंतर घटनास्थळी जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी बाबत माहिती विचारली असता सदर घटनाक्रम हा गोपनीय असून या बाबत आम्ही काहीच माहिती देऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया पथकातील एकाने दिली आहे….