मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी येथेच विधानभवन व मंत्रालय आहे.१२ कोटी जनतेच्या प्रश्नावर वर्षात तीन वेळा तीन ऋतूत विधानसभा व विधानपरिषद सभागृहाचे अधिवेशन होते या अधिवेशनात सर आमदार अप आपल्या विभातील राज्यातील प्रश्न मांडतात व येथे प्रश्न सुटतात असा लौकिक आहे.महाराष्ट्र विधानसभा सभागृहास मोठा इतिहास व परंपरा आहे.संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती नंतर स्व.यशवंतराव चव्हाण ,स्व.वसंतराव नाईक, स्व.विलासराव देशमुख असोत की मनोहर जोशी असोत राजकीय टीका टिपण्णी सभागृह व सभागृहा बाहेर देखील होते पण आता बोलण्याच्या वागण्याच्या मर्यादा पायदळी तुडवल्या जात असल्याचे चित्र आज निर्माण झाले आहे.
काल मुंबईत पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात जाताना मंगळसूत्र चोरांचा निषेध असो,अशा घोषणा दिल्या यामुळे चिडलेल्या विधानपरिषद सदस्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनांचा दरवाजा आमदार आव्हाड यांना लागला तेव्हा दोघात शाब्दिक युद्ध झाले.शिवीगाळ झाली या नंतर दोन्ही आमदार तेथून निघून गेले.
वातावरण निवळले असे असताना विधानभवन लॉबीत अचानक काही लोकांत तुफान हाणामारी झाली त्यामुळे एकच खळबळ उडाली. व या घटनेने सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या राज्याच्या राजकारणाला गालबोट लागले याबाबत अनेक आमदारांनी प्रश्न उपस्थित केला यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करू असे विधानसभा सभागृहात सांगितले पण या निमित्ताने विधानभवन की कुस्तीचा आखाडा असे दुर्दैवाने म्हणावे लागते आहे.