माजी नगराध्यक्ष आरीज बेग यांची उपोषण मंडपाला भेट
गोडवे लेआउट, चिंतावार लेआउट, ग्रिन पार्क, सिसोदिया लेआउट मधील रहिवासी अतिक्रमणाच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या आहे.अतिक्रमणा मुळे रस्त्या अरूध्द झाल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून काहीही कारवाई होत नसल्याने संतापलेल्या महिला अखेर उपोषणाला बसल्या.या उपोषण मंडपाला माजी नगराध्यक्ष आरीज बेग मिर्झा यांनी भेट दिली,अतिक्रमण पीडित नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्याकडून परिस्थिती जाणून घेतली. उपोषण स्थळावरून तहसीलदार श्री वैशाख वाहूरवाघ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री रवींद्र राऊत व भूमिअभिलेख अधिकारी श्री रमेश हेमके यांचेशी संपर्क करून नागरिकांच्या भावना प्रशासनाच्या लक्षात आणून देत अतिक्रमण काढण्याबाबत तातडीने कारवाई करावी अशी विनंती केली. अधिकाऱ्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता श्री दरोळी यांच्याशी मार्गात अडथळा ठरणाऱ्या विद्युत रोहित्र (डी.पी.) स्थलांतरित करण्याबाबत माजी नगराध्यक्ष बेग यांनी चर्चा केली. अतिक्रमण पीडित नागरिकांच्या संघर्षात मी न्याय मिळेपर्यंत सोबत राहीन असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
