पर्यावरण रक्षणाची सर्वांची जवाबदारी आहे.वृक्ष लागवड व संगोपणातून पर्यावरण रक्षणाचे मोठे काम करावे म्हणून शासन पर प्रयत्न करत असते पण ही जवाबदारी नागरिक म्हणून प्रत्येकाची आहे.
संजेरी हॉटेल च्या संचालकांनी एक ग्राहक एक झाड हा अनोखा उपक्रम राबविला तो इतरा साठी प्रेरणादायी आहे.असे मत आर्णी चे कर्तव्यदक्ष ठाणेदार निलेश सुरडकर यांनी व्यक्त केले.
एक झाड, एक ग्राहक या अनोख्या उपक्रमा अंतर्गत संजेरी हॉटेल कडून
५०१ झाडांचे वाटप करण्यात आले. यावेळी पार पडलेल्या
कार्यक्रमाचे अध्यक्ष. आदर्श शेतकरी बाळासाहेब निलावार, प्रमुख पाहुणे म्हणून आर्णीचे ठाणेदार निलेश सुरडकर,पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र देशमुख,आर्णी पत्रकार संघाचे अध्यक्ष आबिद फ़ानन, नगरपरिषद चे माजी बांधकाम सभापती अन्वर पठाण , नगरपरिषद चे आरोग्य विभागाचे अधिकारी हाफ़िज शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विशाल राठोड, संजेरी हॉटेलचे संचालक गफार सय्यद, उपस्थित होते या अभिनव उपक्रमाची संकल्पना हॉटेल संजेरी चे संचालक दिलशाद सैय्यद यांनी अंमलात आणली.कार्यक्रमाचे सूत्र संचलन रियाज सैय्यद यांनी केले. तर आभार प्रदर्शन पत्रकार सद्दाम शेख यांनी केले
विशेष म्हणजे हॉटेल संजेरी चे संचालक गफ्फार भाई सय्यद व त्यांची मुले व्यवसाय सांभाळताना अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी असतात. जेव्हा अरुणा वती नदीला पूर येऊन वाहतूक ठप्प होत असे तेव्हा प्रवाशांना मोफत चहा व पिण्याचे पाणी या परिवाराने दिले आहे.एक ग्राहक एक झाड या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.