विद्यार्थ्यांनी घेतली श्री. रमेश हितनाळी सरांची प्रेरणादायी मुलाखत.
यवतमाळ (दि. १५जुलै २०२५) साने गुरुजी विद्यामंदिर, नगर परिषद शाळा क्रमांक ७, यवतमाळ येथील विद्यार्थ्यांनी शिक्षण व विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रमेश हितनाळी, रीजनल मॅनेजर, अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन, पुणे यांची अतिशय अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी मुलाखत घेतली.
या मुलाखतीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रश्न विचारले – विज्ञानाचे महत्त्व, ग्रामीण भागातील शिक्षणात येणाऱ्या अडचणी, अगस्त्या फाउंडेशनचे कार्य, आणि विद्यार्थ्यांनी करावयाचे आत्मविकासाचे प्रयत्न. श्री. हितनाळी सरांनी प्रत्येक प्रश्नाचे सखोल आणि समर्पक उत्तर देत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या आत्मविश्वास, जिज्ञासा व वक्तृत्व कौशल्याचे विशेष कौतुक केले.
या प्रसंगी केंद्र क्रं.३ चे केंद्रप्रमुख श्री. राजेंद्र मेनकुदळे सर उपस्थित होते. त्यांनीही या उपक्रमाची भरभरून स्तुती केली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.बेनकर मॅडम शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले .
विद्यार्थ्यांना ध्येयवादी बनवणारी शाळा अशी शाळेला उपमा दिली.
या कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापिका सौ. आराधना बेनकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपक्रमशील शिक्षिका सौ. भाग्यश्री धोत्रमपल्ली मॅडम यांचे विशेष योगदान लाभले. शाळेतील सौ.वंदना उईके, श्री राजू कुडमेथे ,सौ. जयश्री चव्हाण, कल्याणी देशकर, सौ. आरती गाडगे या सर्व शिक्षकवर्गाने परिश्रमपूर्वक तयारी करून विद्यार्थ्यांना संवाद कौशल्यासाठी प्रोत्साहित केले.
श्री. रमेश हितनाळी सरांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे आणि शाळेच्या एकंदर कार्यपद्धतीचे मन:पूर्वक कौतुक केले. त्यांनी ही शाळा इतर शाळांसाठी प्रेरणादायक असल्याचे सांगितले. यासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे आत्मभान, आत्मविश्वास व संवादकौशल्य विकसित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या यशस्वी कार्यक्रमाबद्दल शाळेच्या वतीने श्री. हितनाळी सरांचे आभार मानण्यात आले आणि भविष्यात अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे मुख्याध्यापिका सौ. बेनकर मॅडम यांनी सांगितले.