रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने
२०२३ च्या विश्वचषकात आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाने आपले पाचही सामने जिंकले असून सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आता भारताचा पुढील सामना २९ ऑक्टोबरला इंग्लंडशी लखनौच्या एकना स्टेडियम वर खेळल्या जाणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना मोठा धक्का दिला असून या गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. संघाने धर्मशाळा येथे न्यूझीलंड विरुद्ध पाचवा सामना खेळला आणि त्यानंतर संघाला रविवार ३९ ऑक्टोबर रोजी पुढील सामना खेळायचा आहे. अशा स्थितीत संघाला धर्मशाळा येथे दोन दिवसांची विश्रांती देण्यात आली होती.
दरम्यान, संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना कळवले आहे की धरमशालामध्ये त्यांच्यासाठी ट्रेकिंगवर पूर्णपणे बंदी आहे. याशिवाय खेळाडूंना पॅराग्लायडिंगही करता येणार नाही. मात्र, भारतीय खेळाडूंना या विश्रांतीदरम्यान धरमशालामध्ये फिरण्याचा आनंद घेतला.बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले की, ‘संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना सांगितले की ते ट्रेकिंगला जाऊ शकत नाहीत. त्याच वेळी खेळाडू स्पर्धेदरम्यान पॅराग्लायडिंग करू शकत नाहीत, कारण ते खेळाडूंच्या कराराच्या विरोधात आहे. लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर भारताचा विश्वकप स्पर्धेतील सहावा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. वृत्तानुसार, भारतीय संघ या सामन्यासाठी २५ ऑक्टोबरला लखनौला पोहोचेल. हा सामना जिंकून टीम इंडिया वर्ल्ड कपच्या सेमीफायनलच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकेल. आतापर्यंत फक्त टीम इंडियाने या स्पर्धेतील सर्व सामने जिंकले आहेत.
