श्रावण महिना हा शिव शंकर,भोलेनाथ महादेवा च्या आराधनेचे पवित्र पर्व या निमित्ताने निघणाऱ्या कावड यात्रा म्हणजे भक्ती चा अपूर्व उत्साह असे मत यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.संजय भाऊ राठोड यांनी व्यक्त केले.
ते दारव्हा येथे पवित्र श्रावण मासानिमित्त सकल हिंदू समाजाच्या वतीने निघालेल्या मानाच्या कावड यात्रेत विशेष उपस्थिती लावून शिवभक्तांच्या भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात सहभागी झाले होते.
भगवान महादेवाच्या जयघोषात निघालेल्या या कावड यात्रेत शिवभक्तांचा उत्साह, अखंड श्रद्धा आणि अनुशासन पाहून मनोमन पालकमंत्रीभारावून गेले असल्याचे यावेळी ते म्हणाले.
शिवभक्तांनी टाळ–मृदुंगांच्या गजरात, गंगेचे पवित्र जल वाहून नेत, अपरंपार श्रद्धेने महादेवाला अर्पण करण्यासाठी ही यात्रा पूर्ण केली. मोठ्या संख्येने शहरातील नागरिकांनी विविध ठिकाणी यात्रेचे स्वागत करत पुष्पवृष्टी आणि पाणपोईच्या माध्यमातून सेवा दिली.
9
या यात्रेच्या यशस्वी आयोजनात दारव्हा शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. मोठ्या भक्तीभावात ही कावड यात्रा संपन्न झाली.l