राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक अध्यक्ष राज्यसभा खासदार माजी केंद्रिय मंत्री महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचा आदेश धुडकावून एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती च्या सरकारला पाठिंबा देऊन सत्कार मध्ये सहभागी झालेल्या अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस आपली असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला होता.
आज राष्ट्रवादी कोणाची यावर दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगात निर्णय होणार आहे.यापूर्वी शिवसेने बाबत झालेला निर्णय पहाता हा निर्णय निवडणूक आयोग सत्तेच्या दबावात घेते की निपक्ष घेते हे पाहणे गरजेचे आहे.
