२६ नोव्हेंबरला ओबीसींचा महामोर्चा
यवतमाळ मध्ये जिल्हास्तरीय आरक्षण समर्थनार्थ ओबीसींच्या विविध मागण्याकरिता महामोर्चाचे आयोजन 26 नोव्हेंबरला दुपारी साडेबारा वाजता स्थानिक महात्मा ज्योतिराव फुले यांचे पुतळ्या जवळून आझाद मैदान येथून करण्यात आले आहे.
ओबीसी समाजाच्या प्रमुख 15 मागण्या त्वरित तात्काळ पूर्ण करण्यात याव्या या मागणीसाठी 26 नोव्हेंबरला ओबीसी समाजाचा महामोर्चा आयोजित केला आहे. या महामोर्चा मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाजाने संपूर्ण परिवारासह यावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे. ओबीसी महामोर्चा चे आयोजनानिमित्त आठ नोव्हेंबरला आर्णी येथील स्थानिक माहेर मंगल कार्यालय येथे बैठक घेण्यात आली असून यामध्ये विविध मुद्द्यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी यवतमाळ बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील ओबीसी संघटनेचे प्रदीप वादाफळे, एडवोकेट राजेंद्र महाडुळे, सतीश भोयर, शैलेश गुल्हाने, नरेंद्र गद्रे, प्राध्यापक प्रकाश फ्रेंड, रमेश ठाकरे, साहेबराव जुनघरे व मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.