मोठा गाजा वाजा करत जनतेची दिशाभूल करत यवतमाळात झालेल्या शासन आपल्या दारी हा सरकारचा उपक्रम व कार्यक्रम म्हणजे सरकारी निधीची उधळपट्टी ठरली असून या कार्यक्रमातून सामान्य माणूस व शेतकऱ्यांना काय मिळालं असा खडा सवाल करून सरकार विरुद्ध माजी आमदार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा समनव्यक्त बाळासाहेब मुनगिनवार यांनी पत्रकार परीक्षेतून हल्ला चढवला.शेतकरी समस्या मांडणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल का केले असा संतप्त सवाल देखील त्यानी उपस्थित केला.
शासन आपल्या दरी कार्यक्रमास जिल्ह्यातील आमदारांनी पाठ फिरवली ती कशामुळे व दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या कार्यक्रमात नव्हते याकडे देखील त्यानी लक्ष वेधले. यवतमाळ येथील विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेसयवतमाळ जिल्हाप्रमुख संतोष ढवळे उपजिल्हाप्रमुख प्रवीण पांडे,गजानन डोमाळे संजय रेंघे उपस्थित होते.
यावेळी मुनगिनवार यांनी शेतकरी अडचणीत असून कपाशी सोयाबीनला भाव नाही.भरणीमन आणि सिंचन व्यवस्था नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त असतांना शासन आपल्या दारी कार्यक्रमावर तिजोरीतून निव्वळ उधळपट्टी झाली
५०० च्या वर गाड्यांनी लोकांना आणून कार्यक्रम स्थळी लोकांना ताटकळत ठेवल्याचा ठपका सुद्धा बाळासाहेब मुनगिनवार यांनी केला
