अभिनेत्री माधुरी दीक्षित चा पती श्रीराम नेने यांना माधुरी दीक्षित अभिनेत्री असल्याची माहिती लग्न नंतर झाली असल्याची माहिती आता समोर आली आहे.
एक काळ असा होता जेव्हा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच माधुरीने भुरळ घातली होती. पण तुम्ही हे जाणून चकीत व्हाल की, माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने हे माधुरीला ओळखत नव्हते. होय हे खरं आहे. लग्नानंतर डॉक्टर नेनेंसमोर एका अशा रहस्याचा उलगडा झाला. ज्याने ते चकीत झाले. चला जाणून घेऊया हे रहस्य नेमके काय होते.
माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने हे यूएसस्थित हृदय व कार्डियोवॅस्कुलर सर्जन आहेत. माधुरीची डॉक्टर नेनेंशी पहिली भेट अमेरिकेतच झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माधुरी दीक्षितचा भाऊ अजित दीक्षितच्या एका पार्टीत डॉ. नेने आणि माधुरी दीक्षित पहिल्यांदा भेटले होते. यानंतर हळूहळू माधुरी आणि नेने एकमेकांना आवडू लागले.
माधुरीने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, माधुरीने चित्रपटात काम केले आहे याची डॉ. नेने यांना कल्पना नव्हती. ती त्यांना एका सामान्य मुलीसारखी भेटली. माधुरीला ही गोष्ट आवडली की डॉक्टर नेने तिला एक सामान्य व्यक्ती म्हणून पसंत करु लागले होते. माधुरी आणि डॉ. नेने यांचा विवाह १७ ऑक्टोबर १९९९ रोजी अमेरिकेत केवळ कुटुंबीयांच्या उपस्थितीत झाला. मात्र नंतर त्यांचे ग्रँड रिसेप्शन ठेवण्यात आले. माधुरी दीक्षितच्या लग्नाची बातमी ऐकून बॉलीवूडमधील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
एका मध्यम वृत्ता नुसार लग्नाच्या प्रीतीभोजनाचे वेळी उपस्थित राहिलेल्या मोठ्या अभिनेत्या पैकी डॉ. नेने फक्त महानायक अमिताभ बच्चन यांनाच ओळखू शकले. यानंतर माधुरी ही एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे हे जाणून त्यांना आश्चर्य वाटले.