राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दे पेटला असून आरक्षणासाठी अनेक तरुण व मराठा समाज बांधवांनी आत्महत्या केल्याचा दुडावी घटना घडल्या असताना आता मराठा आरक्षणाच्या समर्थनाच्या आडोशाने स्वतःच्या मुलीच्या खुनाचा प्रयत्न डाव जन्मदात्या बापानेचआपल्या मुलीच्या खुनाचा कट रचल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
मराठा आरक्षणाच्या नावाखाली मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न बापाने केला होता. परंतु शेवटच्या क्षणाला त्याचा हाडाव फसला. तसेच, मुलीच्या जीवाचे बरे वाईट करण्यास बापाला अपयश आले. त्यामुळे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे.
छत्रपती संभाजी नगर येथील स्वास्तिकनगर वडगाव कोल्हाटी येथे एका बापाने आपल्या मुलीच्या हत्येचा कट रचला होता. मुख्य म्हणजे, या बापाने मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्याकडून सुसाईड नोट लिहून घेतली होती. या सुसाईड नोटमध्ये मी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहण्यात आले होते. तसेच, या सुसाईड नोटवर तिची सही व अंगठा देखील घेतला होता. परंतु आपल्या सोबत घडत असलेल्या प्रकार मुलीच्या लक्षात आल्यानंतर तिने लगेच आपल्या प्रियकराला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवला. यानंतर मुलीच्या प्रियकराने तातडीने सिडको पोलीस ठाण्यात धाव घेत मुलीच्या कुटुंबियांविरोधात तक्रार नोंद केली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे.
पोलीस आल्यानंतर मुलीने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितला आहे. तसेच, वडिलांनी लिहून घेतलेली चिट्ठी पोलिसांच्या हवाली केली आहे. सध्या ही मुलगी शासकीय आधारगृहात राहत आहे. मात्र तीचे आपल्या प्रियकरावर प्रेम असल्यामुळे तिला त्याच्या सोबतच राहीचे असल्याचे तिने पोलिसांना स्पष्टच सांगितले आहे.