7k Network

संघर्ष यात्रेच्या समारोपाला खा.शरद पवार नागपुरात उपस्थित राहणार..!

राष्ट्रवादीचे संस्थापक व खासदार शरद पवार यांची साथ सोडून पुतण्या अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या मंत्री मंडळात सहभागी होऊन उपमुख्यमंत्री झाले अनेकांनीशरद पवारांचीसाथ सोडली पुतण्याने साथ सोडली तरी नातू आमदार रोहित पवार मात्र आजोबा शरद पवार यांच्या सोबत ठामपणे उभे आहेत.
राज्यातील बेरोजगारांना रोजगार नोकरी स्पर्धा परीक्षा आशा विविध विषयाला घेऊन आमदार रोहोत पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढली आहे पदयात्रेचा समारोप नागपुरात होणार असून हिवाळी अधिवेशनात या यात्रेचा समारोप होणार आहे.नातवाच्या या यात्रेच्या समारोपास खुद्द आजोबा शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांची संघर्ष यात्रा १२ डिसेंबरला नागपूर विधानसभेवर धडकणार आहे. या यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्र्यांनी अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांची २४ ऑक्टोंबर २०२३ पासून संघर्ष यात्रा सुरू आहे. जवळपास ८०० किलोमीटरची ही पदयात्रा आहे.
राज्यातील कंत्राटी नोकरभरती रद्द करा , बेरोजगारी कमी करा, जातनिहाय जनगणना करा, शाळा दत्तक योजना रद्द करावी, महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा लागू करावा, अंमलीपदार्थाच्या विळख्यात सापडलेल्या युवकांना वाचवण्यासाठी ठोस उपाययोजना करा, यासह इतर मागण्यांसाठी ही पदयात्रा काढण्यात आली आहे. १२ डिसेंबरला ही यात्रा नागपूर येथे पोहोचणार असून याचे रुपांतर मोर्चात होवून हा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे. मोर्चाचे झिरोमाईल येथे सभेत रुपांतर होणार आहे. या मोर्चाला संबोधित करण्यासाठी शरद पवार यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
खासदार शरद पवार यांचा वाढदिवस देखील नागपीरातच होऊ शकतो आणि या वाढदिवसाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठसकरे काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे व राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याच्या चर्चा आहेत.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!