दिव्यांगाच्या मसीहा म्हणून ज्यांचीबोलख आहे ते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ना.बच्चू कडू यांच्या प्रयत्नास आणखी एक मोठे यश आले असून दिव्यांग साठीस्वतंत्र पदवीधर महाविद्यालय निर्माण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.आमदार बच्चू कडू व त्यांचे सहकारी आमदार राजकुमार पटेल यांच्या सोबत एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिला होता त्याबदल्यात एकनाथ शिंदे यांच्या सरकारने बच्चूकडू यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन केले असे मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत दिव्यांग अभियान दिव्यांगाच्या दारी या अभियानाचे अध्यक्ष मंत्री दर्जा ना.बच्चू कडूदिव्यंग प्रतिनिधी ज्ञानेश्वर ठाकरे,गौरव मालकविविध विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव यावेळी उपस्थित होते. राज्यातील सर्व बसस्थानक परिसरातील स्टोल वर १०% स्टोल राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या. स्वाधार शासकीयोजनेच्या धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना करावीसर्व शासकीय नोकरीत खऱ्या दिव्यांग उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी सुद्धा बच्चू कडू यांनी केली
दिव्यांग पडताळणीसाठी प्रणाली सुरू करावी असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
