केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा पूर्ण देशात विविध राज्यात १६ नोव्हेंबर पासून सुरू झाली असून या यात्रेसाठी आय.एस दर्जा असलेल्या अधिकाऱ्याला खास प्रशिक्षण क्सयेण्यात आले असून शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून केंद्राच्या व राज्य सरकारच्या विविध योजनांची या यात्रेच्या माध्यमातून जनतेला माहिती देण्यासाठी ही यात्रा आहे मात्र राज्यात मनोज पाटील जरांगे यांच्या मराठा आंदोलनास पाठिंबा म्हणून अनेक गावांत राजकीय नेत्यांना गावबंधी करण्यात आली आहे आज संकल्प यात्रा नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यातील पिंपळगाव महादेव या गावात अली असताना मराठा समाजातील लोकांनी विरोध केला पण सहायक पोलीस निरीक्षकदीपक मस्के यांनी पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात कार्यक्रम रेटला पण गावकरी या कार्यक्रमात आलेच नशेत म्हणून त्याना कार्यक्रम गुंडाळावा लागला यामुळे प्रशासनावर नामुष्की ओढावली आहे.
