7k Network

एसबीआय माहुर शाखेमार्फत मयताच्या वारसदारला एलआयसी कव्हरेज साडेपाच लाखांचा धनादेश वितरित!

*एसबीआय माहुर शाखेमार्फत मयताच्या वारसदारला एलआयसी कव्हरेज साडेपाच लाखांचा धनादेश वितरित!*
माहूर तालुका प्रतिनिधी
बजरंगसिंह हजारी
:- आजच्या प्रचंड धकाधकीच्या जीवनात आपल्या चोहीकडे अनिश्चिततेचे स्तर खूप वाढले आहे.अशात एक मजबूत आर्थिक सुरक्षा कवच असणे गरजेचे आहे.जे आपल्या आणि आपल्या परिवारासाठी कामी यावे.आणि हे काम देशाची सर्वात मोठी जीवन विमा कंपनी एलआयसीने आपली टॅगलाइन “जिंदगी के साथ भी,जिंदगी के बाद भी” यानुसार या गोष्टीची प्रचिती करून दिली आहे.त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे माहूर शहरातील प्रतिष्ठित सराफा व्यापारी रविकिरण भलगे यांचे १५ जून २०२३ रोजी आकस्मिक निधन झाले.
निधनानंतर त्यांच्या वारसांना विमा संरक्षण भरपाई म्हणून भारतीय स्टेट बँक शाखा, माहूरच्यावतीने दि.२२नोव्हेंबर रोजी विमा रक्कम ०५ लाख ५० हजार रूपयांचा धनादेश क्षेत्रीय व्यवस्थापक कालीदासू पकाला यांच्या मार्गदर्शनात शाखा मुख्य व्यवस्थापक कमलेश कुमार व राज एनगंटवार यांच्या हस्ते राज भलगे यांना वितरित करण्यात आला.
माहुर येथील प्रसिद्ध सराफा
व्यापारी रविकिरण भलगे यांनी भारतीय स्टेट बँक शाखा, माहूर येथून वैयक्तिक कर्ज घेतले होते. दरम्यान,यानंतर कर्जदार रवि भलगे यांचे निधन झाले.त्यांनी एसबीआय लाईफ;स्मार्ट प्लॅटिना प्लस प्लॅन ही विमा पॉलिसी घेतली होती.त्याच पाॅलिसीच्या माध्यमातून मयत कर्जदार रवि भलगे यांना विमा संरक्षण भरपाई रक्कम ०५ लाख ५० हजार रूपयांचा धनादेश त्यांचे वारसदार राज भलगे यांना बँकिंग नियमानुसार देण्यात आला.
यावेळी भारतीय स्टेट बँक शाखा माहुरचे सेवा व्यवस्थापक सुधिर गाडेकर,क्षेत्र अधिकारी महेश महाले,सुनील माळे,प्रतिक भोयर,एसबीआय लाईफ क्षेत्रीय अधिकारी संजय जमादार,सृष्टी पखाले,रोहित जगत,निखिल पंदलवाड,आशुतोष रंगारी, वैष्णवी देशकरी,गार्ड नितिन गौळकर यांच्यासह गजानन मनभे,विवेक कदम,राजु आडे,मनोज वैठ्ठी आदी अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!