7k Network

निम्न पैनगंगा प्रकल्प; शासना विरुद्ध धरण विरोधी समितीचा लढा पराकोटीला

निम्न पैनगंगा प्रकल्प;
शासना विरुद्ध धरण विरोधी समितीचा लढा पराकोटीला

साखळी व आमरण उपोषणासह जलसमाधी आंदोलनाचा निर्वाणीचा इशारा

माहूर तालुका प्रतिनिधी बजरंगसिंह हजारी
:- गेली २५ वर्षांपासून पैनगंगा नदी काठावरील विदर्भ व मराठवाड्यातील ९५ गावच्या शेतकरी,गावकरी यांच्या मानेवरची लटकती तलवार बनून शेतकऱ्यांना काळ्या मातीत घाम गाळून काबाडकष्टाने कमावलेली चटणी भाकरी सद्धा गिळू न देणाऱ्या निम्न पैनगंगा प्रकल्पाने सध्या प्रकल्प बाधितांची रात्रीची सुखाची झोप व दिवसाचे चैन हिरावून घेतले असून,आता
मुख्यमंत्र्यांच्या वॉररुम मधून प्रकल्प उभारणीचे काम जाहीर रित्या प्रशासकीय स्तरावरुन धडाडीने हाती घेण्यात आले असल्याने,धरण विरोधी संघर्ष समिती विरुद्ध शासन हा लढा आता पराकोटीला पोहचला असून,जान दे देंगे,मगर जमीन नही देंगे!या ठाम निर्धाराने आज शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता माहूर तहसील कार्यालयासमोर एका लक्षवेधी सभेचे आयोजन करण्यात येऊन निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती द्वारे तहसीलदार (नायब) डॉ. राजकुमार राठोड यांना विविध मागण्यांसह येत्या २८ नोव्हेंबर पासून विविध स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन शासन,प्रशासनास निर्वाणीचा ईशारा म्हणून देण्यात आले.निवेदनाच्या प्रति तालुका ते जिल्हा प्रशासन तसेच पालकमंत्री ते मुख्यमंत्री आणि पंतप्रधान ते राष्ट्रपती यांना पाठविण्यात आल्या आहेत.

“राज्यात मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्यातील माहूर,किनवट, आणि यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी,घाटंजी,महागाव या तालुक्यांमधील पैनगंगा नदीवरील नियोजित”निम्न पैनगंगा धरणाला”तसेच संबंधित सर्व धरणग्रस्त गावातील जमिनींच्या भूसंपादनास व इतर अनुषंगिक शासकीय कार्यवाहीस सनदशीर,
घटनात्मक व शांततापूर्ण मार्गाने संबंधीत सर्व ९५ धरणग्रस्त गावातील संपूर्ण ग्रामस्थांचा सरसकट जाहीर विरोध दर्शविण्यासाठी”निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती”व्दारे शासनास सादर केलेल्या चितळे यांचे अध्यक्षतेखाली शासनाव्दारे नियुक्त विशेष चौकशी समितीने (SIT) या प्रकल्पावर आक्षेप् घेतला असतांनाही तसेच संबंधित सर्व ९५ धरणग्रस्त गावांमधील संपूर्ण ग्रामस्थांचा धरणाला प्रखर विरोध असून देखील धरणासंदर्भातील कामांसाठी कंत्राटदार नियुक्त करण्याबाबतची टेंडर नोटीस शासनाव्दारे काढण्यात आलेली आहे.
पैनगंगा नदीवरील नियोजित निम्न पैनगंगा धरणाला तसेच संबंधित सर्व धरणग्रस्त गावातील जमिनींच्य भूसंपादनास व इतर अनुषंगिक शासकीय कार्यवाहीस जाहीर सरसकट विरोध दर्शविण्यासाठी संबंधीत सर्व ९५८ धरणग्रस्त गावांमध्ये संपूर्ण ग्रामस्थांव्दारे सनदशीर, घटनात्मक व शांततापूर्ण मार्गाने २८ नोव्हेंबर पासून साखळी उपोषण,०१ डिसेंबर पासून आमरण उपोषण व ०४ डिसेंबर पासून जलसमाधी अशाप्रकारचे जाहीर आंदोलन करण्यात येणार असल्याची बाब सदर निवेदनामध्ये प्रकर्षाने नमुद करण्यात आलेली आहे.

हे पाहता,उक्त निम्न पैनगंगा धरणास असलेला संबंधित सर्व ९५ गावातील ग्रामस्थांचा असलेला प्रखर विरोध तसेच त्यांची असलेली हालाखीची परिस्थिती व उपरोक्त वस्तुस्थितीचे गांभिर्य आणि तातडीची निकड विचारात
घेवून यासंदर्भात शासनाने सर्वसमावेशक प्रतिबंधात्मक तसेच विकासात्मक उपाययोजना करून धरणग्रस्त गावातील संपूर्ण ग्रामस्थांच्या सर्व मागण्या तातडीने मंजूर करणे आवश्यक असल्याबाबतचे निवेदन मराठवाडा व विदर्भातील नांदेड यवतमाळ जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील तहसील कार्यालयात आज एकाच दिवशी देण्यात आले.त्याच अनुषंगाने माहूर तहसील कार्यालयाच्या वतीने तहसीलदार यांच्या वतीने नायब तहसीलदार डॉ.राजकुमार राठोड यांनी तहसील कार्यालयासमोरील सभा स्थळीभेट देऊन धरण विरोधी समितीचे म्हणने व मागण्या ऐकून घेत सर्व ग्रामस्थांच्या वतीने सादर करण्यात आलेले लेखी निवेदन स्विकारले.
यावेळी धरण विरोधी समितीचे डॉ.बाबा डाखोरे,विजय पाझारे,समितीच्या बुलंद महिला तोफ डॉ.सुप्रिया गावंडे,कॉ.शंकर सिडाम,कॉ.किशोर पवार यांच्यासह लेखनी प्रमाणेच आपली सडेतोड आणि रोखठोक भूमिका मांडणारे ज्येष्ठ पत्रकार नंदु संतान यांची धरणाला विरोध करणारी प्रखर प्रभावी भाषणे झाली.
प्रास्ताविक,सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉ.प्रल्हाद चव्हाण यांनी केले.यावेळी माहूर तालुक्यातील धरणग्रस्त गावातील अनेक सरपंच,
सदस्य,विविध पक्षाचे पदाधिकारी,व धरणग्रस्त समिती चे कार्यकर्ते विशेषकरून महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

 

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!