हिवाळी अधिवेशनात नागपुरात सभागृहात बोलतांना आमदार बच्चू कडू पुन्हा सरकार वर जोरदार बरसले
शहरी व ग्रामी असा भेद का करता कलेक्टर ला पगार किती आणि काम किती असा प्रश्न पुन्हा कडू यांनी उपस्थित केला
शहरात घरकुला च्या साठी २५०००० रुपये व ग्रामीण भागात १२५००० रुपये हा भेद का? तुमच्या (सरकारच्या) डोक्यात भुसा पडला आहे का? असा संताप व्यक्त केला.
पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील याच्यावर सुद्धा ‘प्रहार’केला
गुलाबराव तुमच्या खात्यात सुद्धा तीच बोंब आहे
शहरात माणसाला ७५ लिटर पाणी व खेड्यात ५० लिटर पाणी हाही तफावत संपवा नाही तर मी तुमच्या गावात येऊन सांगेल असे म्हणत
पुन्हा एकदा योजना मधली तफावत दूर करण्याचा प्रयत्न करावे असे सांगितले.
जर १३५००० रुपयात जर घर बांधणे होत असेल कोणी बांधून देणार असेल तर मी मिशी व दाढी काढतो असेही कडू म्हणाले.
सभागृहाच्या भीतीला तडे जात आहेत अजून किती बोलायचे?
तुम्ही कधी बोलणार असा सवाल सुद्धा कडू यांनी सरकार मधील आमदारांना केला.
