*दिव्यांग 5%निधी वाटप करा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव दि 26/12/2023 रोजी ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन करणार निवेदन देऊन प्रहार ची मागणी*
ग्रामपंचायत कार्यालय किनगाव येथे प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे आज जिल्हा अध्यक्ष राजु भाऊ चौगुले , जिल्हा संघटक संभाजी दादा केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अपंग बांधवांचा आर्थिक वर्षातील राखीव निधी वाटप करण्यासाठी उपसरपंच मा विठ्ठलरावजी बोडके भाऊ यांना निवेदन देण्यात आले. दिव्यांग व्यक्ती समान संधी हक्काचे संरक्षण व संपूर्ण सहभाग अधिनियम 2019,95 मधील कलम 40 अन्वये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपंग कल्याणासाठी 5% निधी राखीव ठेवण्या बाबत निर्देश दिलेले आहेत अपंग हक्क अधिनियम 2016 मधील कलम 37 नुसार ग्रामपंचायत कार्यालय यांनी 5% निधी वाटप करण्याचे निर्देश आहेत. आपल्या किनगाव ग्रामपंचायत अंतर्गत 80 ते 85 अपंग बांधव आहेत.ग्राम सभेत बैठकीत विषय घेऊन देखील आजपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय किनगाव यांनी निधी वाटप केलेला नाही तरी मा साहेबांनी 5% राखीव निधी तात्काळ वाटत करावा अशी विनंती प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे करण्यात आली. योगय असा निधी वाटप करण्यात आला नाही तर दि 26/12/2023 मंगळवार रोजी प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव सर्व पदाधिकारी उपस्थित व अपंग बांधवांना सोबत घेऊन ग्रामपंचायत कार्यालय किनगाव समोर बेमुदत ठिय्या धरणे आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदन देण्यात आले प्रमुख उपस्थिती प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शाखा अध्यक्ष योगेश आमले, उपाध्यक्ष मोहसीन शेख, तालुका युवक अध्यक्ष बाळु आमले, शाखा कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी, युवा अध्यक्ष गोविंद आंधळे,सचिव दशरथ हैगले, सहसचिव महेश चाकाटे, संघटक वैजनाथ सुनेवाड, प्रहार सेवक कलीम शेख, शैलेश सोनवणे अपंग बांधव बशीर शेख , परमेश्वर इंदुलकर , लटपटे ताई,बक्षुमिया देशमुख इतर प्रहार सेवक अदिजण उपस्थित निवेदन देण्यात आले.
