मी मराठा आरक्षणाचा विरोधक नाही
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही माझीही मागणी आहे ।मी मराठा आरक्षणाला कधीही विरोध केला नाही.पण माझी मागणी जी आहे ती ओबीसी आरक्षण कायम रहावे ही होती तीच भूमिका सर्वांचीच आहे मग मलाच टार्गेट करून खलनायक का ठरवल्या जात आहे? असा प्रश्न अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधसनसभेत केली ते नागपुरात हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चेत भाग घेत बोलत होते.
जय प्रमाणे सारथी साठी शासनाने तरतूद केली तेव्हढीच तरतूद महा ज्योती साठी करावी ओबीसी विध्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यात यावे.ओबीसी विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतांना व्यावसायिक हा शब्द वगळण्यात यावा जो सारथी मध्ये नाही अजूनही धनगर विद्यार्थ्यांचे प्रस्ताव धूळखात पडलेली आहे असेही भुजबळ म्हणाले
नेहरू च्या काळात ओबीसी आरक्षण मिळाले राज्यात वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना १९६२-ला १६% ओबीसी आरक्षण मिळाले त्या नंतर मंडल आयोगा मूळे ते आरक्षण २७% झाले असे भुजबळ म्हणाले.
बिड मधील जाळपोळ, उल्लेख करून मला कुटुंबातील सदस्यांच्या नावावरून घाण घाण मॅसेज आले असे सांगून भुजबळ भावनिक झाले होते.
