7k Network

माळराणावर बहरली निर्यातक्षम ‘संत्राबाग’ प्राध्यापकाचे कस्ट आले फळाला….!

शेती हा घाटयाचा व्यवसाय आहे.कधी निसर्गाची अवकृपा तर कधी बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी त्त्रस्त असतात.
पण संकटावर मात करूनही बळीराजा पिक पिकवतोच
काही शेतकरी हे प्रयोगशील असतात आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन घेण्यासाठी देखील ते धडपडत असतात.
सिंचनाची सोय असली की मग मात्र शेतकरी रब्बी नाहीतर खरीप अथवा कुठल्या तरी पिकात दोन पैसे मिळतील ही शेतकऱ्यांची अपेक्षा असते.
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात कापूस सोयाबीन तूर चना हे पीक प्रामुख्यानेघेतली जातात हा जिल्हा शेतकरी आत्महत्या साठी कुप्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात फळबागा चे प्रमाण अत्यल्प आहे.पण शेतीची विशेष आवड असणारे आर्णी तालुक्यातील काठोडा गावचे मूळ रहवासी असलेले व आर्णी येथे स्थायिक झालेले आणि येथील प्रसिद्ध स्व.राजकमल भारती कला व वाणिज्य महाविद्यालयात अर्थ शास्त्राचे प्राध्यापक असलेले विनीत माहूरे यांच्या कडे वडिलोपार्जित शेतजमीन भरपूर आहे.
ती शेतजमीन त्यांचे लहान बंधू अच्युत माहुरे पाटील व विनीत माहुरे हे सांभाळत असतात या जमिनीवर देखील ते विविध प्रयोग करत असतात. अशातच नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील ‘हातला’ गावातील प्रगतशील शेतकरी जुनघरे यांच्या शेतीला प्रा.विनीत माहुरे यांनी भेट दिली
जूनघरे यांनी माळरानावर संत्रा मोसंबी व इतर बागा फुलवल्या
त्यासाठी त्यानी मोठे शेततळे खोदले व सिंचनाची सोय केली.
त्यांच्या परिश्रमातून फुललेल्या शेतीला माजी केंद्रीय मंत्री खा.शरद पवार यांनी सुद्धा भेट दिली आहे.
जेव्हा विनीत माहुरे हे गावी परतले तेव्हा त्यांनी घरच्या वडिलोपार्जित जमिनीत संत्रा लागवडी चा प्रयोग करण्यासाठी प्रयत्न केला पण जमिनीचा पोत चांगला असल्याने संत्रा व्यवस्थित येणार नाही हे कळल्यावर त्यानी आर्णी नजीक दत्तरामपूर शिवारात मुरमाड जमीन विकत घेतली जमिनीला लागूनच अरुणावती प्रकल्पाचा मुख्य कालवा असला तरी त्या शेतीला पाणी मिळणार नसल्याने माहुरे सर यांनी मोठे शेततळे तयार केले आणि संत्रा झाडे लावले…
सिंचनाचे सूक्ष्म नियोजन केले.पहाता फाटा संत्रा बॅग बहरली
आणि निर्यातक्षम संत्रा फळाला आला
यंदा त्यांची बाग ३५ लाख रुपयात विकल्या गेली
तरीही बांग्लादेश मधील निर्यातीवर कर सहा पट वाढल्याने कमी रक्कम मिळाली अन्यथा हीच बाग १००००००० रुपयात विकल्या गेली असती असे प्रा.माहुरे यांना वाटते.
शेतकऱ्यांनी प्रयोगशील असावे व शासनाने शेतीला बारमाही सिंचन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असेही माहुरे सरांना वाटते.
संत्रा बॅग पहा:

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!