7k Network

घर जाळणाऱ्याचे हात कलम करा पण ५० आत्महत्या झाल्या…बच्चू कडू यांचे आरक्षण मुद्द्यावर रोखठोक मत..!

बिड मध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या या घटनेचा निषेधच आहे
घरे जळणाऱ्याला बेदम मारा ठोका घर जाळण्या पर्यंत जर मजल गेली तर घर जळणाऱ्यांचे हात कलम करा. पण मराठा आरक्षणासाठी ५० लोकांनी आत्महत्या केल्या त्याचा साधा उल्लेख देखील कोणी करत नाही ही दुःखाची बाब आहे आम्ही एवढे कसे जातीयवादी झालो असे म्हणत आमदार बच्चू कडू यांनी अप्रत्यक्षपणे मंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावला. आम्हाला जाती धर्माचे राजकारण करतांना लाजा कशा वाटत नाहीत असा संताप कडू यांनी व्यक्त केला.
मराठा हाच कुणबी व कुणबी हा मराठा असल्याचे ८०० वर्षापूर्वी चे दाखले यावेळी बच्चू कडू यान8 सभागृहात वाचून दाखवले.
ज्या महात्मा फुले यांनी छत्रपती शिवरायांचा पहिला पोवाडा रचला त्यात कुणबी असा उल्लेख आहे ‘मी
“महात्मा फुले याचा कार्यकर्ता आहे त्यांच्या विचारांवर
चालताना मरण आले तरी बेहत्तर” म्हणत आम्ही त्याना सुद्धा खोटे ठरवणार का? असा प्रश्न विचारला.
आज बच्चू कडू याचे आरक्षणावर केलेलं सभागृहातील भाषण सत्ताधारी व विरोधक अतिशय शांततेणे व गंभीरपणे ऐकत होते.
‘शेतकरी सुखी व्हावा किंवा शेतकऱ्यांना सुखी करण्याची धमक आमच्यात नाही’.
जर एक शेतकरी सुखी झाला तर गाव सुखी होईल पण तुमच्याकडे ती हिम्मत नाही म्हणून सरकार वर ताशेरे ओढले
मी कधीच जाती धर्माचे प्रश्न उपस्थित केले नाही.
शेतकरी, शेतमजूर,दिव्यांग, अनाथांची बाजू घेतली पण जेव्हा एका मराठा योगेश नावाच्या तरुणाने आत्महत्या केली कारण त्याला एव्हढे शिकून नोकरी लागत नाही हा विचार त्याच्या डोक्यात होता म्हणून त्याने आरक्षण मुद्द्यावर जीवनयात्रा संपवली मी त्याच्या घरी गेलो तेव्हा फक्त अश्रू दिसत होते.
घर मोडकळीस आले होते कधी घर पडेल सांगता येत नाही अशी स्थिती होती. योगेश च्या वडीलांनी सुद्धा आत्महत्या केलेली होती आम्हाला काहीच वाटत नाही?
एव्हढे आम्ही करंटे झालो असे सांगताना सभागृहात वातावरण गंभीर झाले होते.
यावेळी बोलताना त्यानी मनोज जरांगे यांनीही आता व्यक्तिगत टीका टाळली पाहिजे आपण सर्वांनी एकत्र येत काम केले पाहिजे त्यासाठी ओबीसी आरक्षण वाढवून घ्या त्यातूनच मराठा समाजाला आरक्षण द्या असे मत व्यक्त करतांना
ज्या डॉक्टर बाबासाहेबानी आम्हाला घटना दिली त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री करा
मराठा मुख्यमंत्री झाले मग तेली माळी धनगर का मुख्यमंत्री होऊ शकत नाही
आणि ओबीसीत सुतार कुंभार सोनार किती संख्येने आहेत त्याना आरक्षणाचा किती लाभ होतो?
आज सभागृहात जोरदार व रोखटोक भूमिका मांडल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!