काँगेस कडून युवा नेते जितेंद्र मोघे यांच्या नेतृत्वाखाली घाटंजी येथील उपोषणाला यश आल्याचे दिसत आहे. घाटंजीचा दुष्काळग्रस्तात सामावेश होणारं.
अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार – तहसिलदार साळवे
शेती पिकांच्या नुकसानीच्या नुसार आणेवारीत मोठी तफावत स्थानिक प्रशासनाकडून जाहिर करण्यात आल्याने तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात आले नाही. या कारणाने शेतकऱ्यांत संतापाची लाट निर्माण झाली आहे. तर वीजपुरवठा, कर्जपुरवठा, हमीभाव व शासनाच्या इतर निष्क्रिय धोरणांवर नाराजी व्यक्त करत काँग्रेस पक्षाकडून तहसिल कार्यालया समोर दोन दिवसीय लाक्षणिक साखळी उपोषण करण्यात आले होते. आज या उपोषणाची तहसिलदार विजय साळवे यांनी दखल घेत तहसील स्तरावरील मागण्या मान्य करत अन्य मागण्यांचा वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. दरम्यान तहसीलदारांनी नारळपाणी देतं माझे उपोषण सोडविले. उपोषणाच्या माध्यमातुन केलेले मागण्या पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. काँग्रेस आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला.
आज या उपोषणाला यश आल्याने माजी मंत्री शिवाजीराव मोघे , माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके , जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, अरविंद वाढोनकर व पदाधिकारी व हजारों शेतकरी उपस्थित होते.