आत्म निर्भर भारत,विकसित भारत ह्या संकल्पना केंद्र सरकारच्या संकल्पनेतून प्रत्त्यक्षात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने देशात राबविलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी’विकसित’भारत नावाची संकल्पना राबून एका वाहनाला चित्ररथ बनवून त्यावर एलएडी स्क्रीन वरून गावा गावात योजनांची मशीती देण्यासाठी शास्निय अधिकारी जात आहेत.पण अनेक गावांत या यंत्राला स्थानिक ग्रामस्थ जोरदार विरोध करत असल्याचे चित्र समोर येत आहे यात्रेतील अधिकाऱ्यांना वेगवेगळे प्रश्न आता जनतेतून विचारल्या जात आहे यामुळे आक्रमक गावकऱ्यां पुढे उत्तर देतांना अधिकाऱ्यांची दमछाक होतांना दिसत आहे.महागाई,बेरोजगारी शेतीमालाचे पडलेले भाव यामुळे विकसित यात्रेतील अधिकारी निरुत्तर होतांना दिसत आहेत.
