संभाजीनगर येथील व्हिडिओकॉन कंपनीवर प्रहार चे सुधाकर शिंदे यांचा प्रहार
(प्रतिनिधी संदीप ढाकुलकर)
मिळालेल्या बातमीनुसार काल दिनांक 14 रोजी प्रहार चे नेते सुधाकर शिंदे यांनी व्हिडिओकॉन कंपनीवर हल्लाबोल आंदोलन केले सूत्रांच्या माहितीनुसार व्हिडिओकॉन कंपनी ही गेल्या सहा सात वर्षांपासून बंद आहे तरी मात्र कंपनी मॅनेजमेंटने आतापर्यंत कामगारांचा पगार चालू ठेवला होता परंतु मागील दोन महिन्यापासून पगार बंद केले आहे पगार पूर्व चालू करण्यासाठी प्रहार चे नेते सुधाकर भाऊ शिंदे यांनी कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केले आणि हा प्रश्न वंदनीय बच्चुभाऊ कडू यांच्यापर्यंत पोहोचू आणि कामगारांना न्याय मिळवून देऊ असे वक्तव्य केले आणि या प्रश्नावर बच्चू भाऊं विधानसभेत सुद्धा आवाज उठवेल अशी ग्वाही दिली यावेळेस प्रहार कामगार संघटना यांचे सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,
