उमेद,अंतर्गत येणाऱ्या विविध कॅडर च्या मागण्यांन करिता आणि बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या 48 महिन्याच्या पगार करिता प्रहार च्या नेतृत्वाखाली निघालेला वर्धा ते नागपूर पायी आक्रोश मोर्चा आज विधानभवन वर धडकला प्रहारचा आजचा मोर्चा ठरला सर्वात मोठा मोर्चा,
आज या प्रहार च्या आक्रोश मोर्चा मध्ये
धाराशिव, गोंदिया, गडचिरोली, भंडारा,
तसेच विदर्भातील सर्व जिल्हय़ातील महिला या ठिकाणी आल्या होत्या,
जिल्हय़ातून सुरू केलला हा मोर्चा
आणि लेखापाल महिला यांच्या पासुन सुरुवात झाली आणि सर्व कॅडर त्या मध्ये मोठ्या ताकदीने एका बॅनर खाली पहिली वेळेस सहभागी झाले,
परंतु ही ताकद आणि हा संघर्ष सुरू ठेवाव लागेल,
इथेच शांत बसुन चालणार नाही,
संघर्ष खूप मोठा आहे त्या करिता आपण तयार असल पाहिजे.
सर्व कॅडर यांच्या मागण्या पूर्ण करण्या करिता प्रहार आपल्या सोबत आहे,
आजचा मोर्चा अधिवेशन ठिकाणी धडकला त्या ठिकाणी प्रहार पक्षाचे आमदार वंदनीय बच्चूभाऊ कडू यांनी त्या ठिकाणी येऊन मोर्चात सहभागी होत मार्गदर्शन केले,
त्यांनी सर्व मागण्यांन करिता मा.मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सोबत चर्चा करून लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल असे मार्गदर्शन केले.
सोबत बच्चूभाऊ यांनी बापुराव अभियांत्रिकी महाविद्यालय चा विषयावर ही मुख्यमंत्री यांच्याशी बोलण्यात येईल असे आवर्जून सांगितले,
माननीय भाऊ अतिशय व्यस्त असूनही त्यांनी आपल्या आक्रोश मोर्चा ला त्या ठिकाणी येऊन भेट दिली आणि आपल्याला मार्गदर्शन केले त्याकरिता मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
सर्व महिला व कार्यकर्ते यांचे विशेष आभार गेल्या 3 दिवसा पासुन सर्व कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेतली त्यांच्या सहकार्या शिवाय हे सर्व शक्य नसते,
प्रीतम कातकीडे,समीर शेख,
भूषण येलेकार ,शैलेश कोसे, अमोल आव्हाड,मुकेश वाघमारे, सूरज घायवट,
श्रीकांत पेरकुंडे, आशिष अंभोरे,
या सर्व कार्यकर्ते यांचे मनापासून धन्यवाद.
येतो शुरुआत है,
लढाई अभी बाकी है.
विकास वासुदेवराव दांडगे
प्रहार जनशक्ती पक्ष
वर्धा जिल्हा प्रमुख.