7k Network

*निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती च्या वतीने पडसा पेडवर जलसमाधी आंदोलन

*निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती च्या वतीने पडसा पेडवर जलसमाधी आंदोलन*
माहूर/अमजद खान
गेली अठ्ठावीस तारखेपासून माहूर तालुक्यासह आर्णी तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या गावात धरण विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून धरणे आंदोलन जलसमाधी आंदोलन आमरण उपोषण सारखी आंदोलन सतत चालू असताना विधानसभेमध्ये या संदर्भात काही मुद्दे मांडल्यानंतर धरणविरोधी संघर्ष समितीने तात्पुरत्या स्वरूपात स्थगीत केले असल्याने धरण विरोधी संघर्ष समितीचे चालू असलेले आंदोलन मागे घेत असताना आज पडसा येथील पैनगंगा नदीमध्ये समारोपीय समाधी आंदोलन घेऊन समारोप करत आहे . हे आंदोलन करीत धरणविरोधी संघर्ष समितीची नेहमीचीच असलेली मागणी धरण रद्द झालं पाहिजे हीच मागणी असून यामध्ये दुसरा कुठलाही पर्याय नाही धरणाला आमचा विरोध आहे धरण रद्द झाला पाहिजे हीच प्रमुख मागणी घेऊन धरण विरोधी संघर्ष समिती गेली 25 वर्ष हा लढा देत आहे आणि भविष्यात पण हा लढा तसाच राहील असे बोलताना संघर्ष समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आलेले .यावेळी गोकुळ ,वडसा , पडसा, कवठा बाजार येथील अनेक शेतकरी महिला पुरुष मोठ्या संख्येने या जलसमाधी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे अनेक महिलांनी धरणाच्या संदर्भात वेगवेगळे गीत गायली आपले मनोगत व्यक्त केले त्याबरोबर पुरुष मंडळींनी पण गीत गायन करून आपले दुःख गायनाच्या माध्यमातून व्यक्त केले .हे धरण नवे मरणच आहे असं सर्वांच्या बोलण्यातून व्यक्त होत असताना अनेक लोकांनी या धरणाच्या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. सर्वच राजकीय पक्ष वारंवार धरणाला विरोध असल्याचे सांगत असताना हा धरण होतोच कसा हा प्रश्न पण शेतकऱ्यांना आज भेडसावत आहे .सर्वच पक्षांचा विरोध असताना सुद्धा धरण होण्याचा काहीच कारण नाही पण धरण बांधण्यासाठी कोण आग्रह करतात हे प्रश्न न उलगडणारा आहे . तेव्हा या जलसमाधी आंदोलनाला प्रकाश गायकवाड ,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव .कॉ शंकर सिडाम डॉ बाबा डाखोरे प्रल्हाद चव्हाण डॉ शुभा डाखोरे पडसा गावातील सुरेश गावंडे मदनापूर येथील अशोक दालपे यांच्यासह सुभाष डाखोरे ,संजय मानकर यांनी संबोधित केले तर महिला प्रतिनिधी म्हणून नंदूताई बोक्से यांनी पण या धरणाच्या संदर्भात आपल्या व्यथा येथे मांडल्या तेव्हा येत्या काळामध्ये धरण विरोधी संघर्ष समितीचा लढा कायम राहणार असून जोपर्यंत धरण रद होणार नाही तोपर्यंत आमचा लढा कायम राहणार आहे असं ठाम विश्वास सर्वांनी व्यक्त केला आणि पैनगंगा नदीच्या पात्रामध्ये बसून सर्व महिला पुरुष आपल्या घरून आणलेला डबा एकत्र बसून सामूहिक रित्या जेवण करून या आंदोलनाची सांगता करण्यात आली . यावेळी संजय राठोड ,प्रविण , संतोष रामेवार , गजानन डाखोरे , संदिप दुमपलवार सह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थीत होते .

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!