प्रतिनिधी संदीप ढाकुलकर
खामगांव येथील शेतकऱ्यांचे आंदोलन तूर्तास मागे
बोरी आडगाव येथील शेत करी बांधवांनी विविध मागण्यासाठी आंदोलन केले होते सोमवारी रात्री उशिरा जिल्हा अधिकारी श्री किरण पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले . सूत्रानुसार दुपारी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चात शेतकरी आणि पोलीस प्रशासन यांच्यात हमरी तुमरी झाली. याचा निषेध करीत शेत करी बांधवांनी शहरातील विकमशी चौकात अर्धनग्न आंदोलन केले या घटनेची दखल बच्चू कडू यांनी घेत प्रहार पदाधिकारी गजानन लोखंडकर यांना सूचना देतं आंदोलन ठिकाणी जाण्यास सांगितले या वेळी आंदोलनात उडी घेत प्रहार चे नेते गजानन लोखांडकर यांच्या सह रावसाहेब पाटील अनंता जुमडे राजेन्द्र पाटील सुरेंद्र सुरवाडे आदी सहभागी झाले होते.खामगांव तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करा हेक्टरी आर्थिक मदत करा सक्तीची कर्ज वसुली थांबवा यासह विविध मागण्या साठी मोर्चा काढत उपोषण केले पण गेंड्या च्या कातडीच्या सरकारने या आंदोलनाची दखल नाही घेतली त्या मुळे शेतकरी बांध वानी ट्रॅक्टर मोर्चा काढत शासनास जागे करण्यासाठी उपोषण केले होते
