रोटरी क्लब ची सामाजिक भूमिका व कार्य हे अभिमान वाटावा असे असल्याचे मत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी म्हटले
वणी येथे रोटरी उत्सव २०२३-२४ च्या कार्यक्रमाला अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय तथा पुर्व केद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज भैय्या अहीर यांनी भेट दिली येथे अहिरे बोलत होते. गरजु शालेय विद्यार्थीनींना सायकलचे वितरण केले, उपस्थित लोकांना संबोधितही केले यावेळी रोटरी क्लबचे पदाधिकारी निखिल केडीया, लवलेश लाल, अनिल रावत, अरुण कावडकर, अंकुश जयस्वाल तसेच भाजपाचे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष दिनकरराव पावडे, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर बावणे, गजानन विधाते, पवन एकरे, बंडु चांदेकर यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी किदरे, पोलिस निरिक्षक जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
