देशभरात वाहन चालकांनी पुकारलेला बंद अखेर मागे घेण्यात आला आहे. एक दोन दिवसांच्या संपा मुले किती बिकट स्थिती निर्माण झाली हे सरकारने पाहिले.त्यामुळे नमते घेत
हिट अँड रण मधील नव्या तरतुदी तुरट लागू करणार नाही असे आश्वासन सरकारला द्यावे लागले आहे.
शेतकरी कायदे एक वर्ष आंदोलन केल्या नंतर रद्द करण्यात आले होते पण एका दिवसाच्या संपा मुळे वाहन कायद्याच्या अंमलबजावणी आताच होणार नाही हे सरकार ला सांगावे लागले.
शेतकरी आंदोलना दरम्यान ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.वाहन चालकांच्या संपात मात्र कुठलीही जीवितहानी झाली नाही.हा एकतेचा विजय असल्याचे चालक संघटनांनी म्हटले आहे.
