बच्चू कडू होणे सोपे नाहीच…
एखादं दुसऱ्या आंदोलनातून एखादा विशेष हेतू ठेवून काम करून,एका दोन दिवसात बच्चू कडू होता येत नाही त्यासाठी उपेक्षितांना न्याय देण्यासाठी अविरत झटावं, झिजव लागतं.
स्वार्थाला थारा न देता,दिव्यांग, शेतकरी,शेतमजूर,कामगार
यांच्या उन्नति चे स्वप्न उरात साठवून ठेवावे लागतात.
सार्वजनिक,राजकीय जिवन जगत असतांना सेवा त्याग समर्पण संघर्ष स्वीकारावा लागतो मग कुठं अशा कठोर परिश्रमातून बच्चू कडू यांच्या सारखे नेतृत्व उदयाला येते.
कार्यकर्त्यांच्या पायाला ठेस लागली तर डोळ्यातुन पाणी यावं
असे नेतृत्व करतांना वरून नारळ,फणस वाटणारे बच्चू कडू यांचे नेतृत्व म्हणजे असाधारण अद्वितीय अलौकिक असे नेतृत्व होईल की नाही असे वाटत असताना
होय एक आश्वासक चित्र पहायला मिळत आहे.आणि दुसरा बच्चू कडू होणे सोपे नसले तरी अजून एका बच्चू कडू उदयास येत आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून आमदार बच्चू कडू यांचा पुत्र देवा कडू आहे
हे म्हणण्यास कारण तसेच आहे.
अमरावती च्या एका ब्लड बँकेत एक तरुण येतो
आणि रक्तदान करतो,माजी राज्यमंत्री एका पक्षाच्या पक्ष प्रमुखाच्या पुत्राचा साधेपणा सर्वानाच चकित करणारा ठरला
पद प्रतिष्ठा पैसा आणणाऱ्या बापाची मुलं कशी वागतात याचे अनेक उदाहरण आपण पाहतो
पण वडिलांच्या वलयाचा कुठलाही अभिनिवेष न बाळगता असे साधेपणाने कसे रहाता येते हा मोठा प्रश्न देवा कडू यांच्या कडे पाहून वाटतो.
आपल्या मित्राला रक्ताची आवश्यकता असताना वजन भारत नाही म्हणून खिशात दगड ठेऊन पाणी पिऊन रकडं करणारा त्या काळच्या युवा बच्चू कडू आणि आजचा देवा कडू दोन्ही वेळची परिस्थिती वेगळी जरी असली तरी रक्तदान हा एक समान धागा दोघांच्याही आहे.आणि रक्ताचा वारसा देखील आहे. देवा कडू यांनी रक्तदान करण्याची ही दुसरी वेळ आहे.
आम्ही विराट कोहलीच्या शतकाच्या शतकाची चर्चा करतो
मात्र जगात रक्तदानाचे शतक करणाऱ्या आमदार बच्चू कडू यांच्या या अनोख्या सामाजिक विक्रमाची जास्त चर्चा का करत नाही
वडिलांचा रक्तदानाचा वसा घेऊन रक्तदान करणाऱ्या देवा चा अभिमान वाटतो. नव्या वर्षाच्या स्वागत रक्तदान करून देवा कडू यांनी केले त्यास वडील बच्चू कडू
आई डॉ.नयनाताई व वडील बच्चू कडू यांच्या संस्काराची शिदोरी घेऊन देवा कडू यांच्या रुपात नव्या पिढीला एक नवा बच्चू कडू मिळावा हीच अपेक्षा व ईश्वर चरणीं प्रार्थना
प्रमोद कुदळे
संपादक बोल महाराष्ट्र
