दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासाठी लाभार्थ्यांना कमाल पावणेचार लाख रुपये अनुदान मिळणार आहे. यासाठी ई रिक्षा मिळण्यासाठी ऑन लाईन अर्ज भरण्याची मुदत वाढून देण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र सचिव दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांना दिले आहे.
